पेपर फुटीचे सत्र सुरूच, टीईटी परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचे उघड

यामध्ये दोषी असलेला जी.ए. टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुखला पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहे.
TET exam paper leak

TET exam paper leak

Sarkarnama

Published on
Updated on

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पेपर फुटीच सत्र सुरूच आहे. काही दिवसापुर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या (Department Of Health) आरोग्य भरतीचा पेपर फुटला. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) गृहनिर्माण विभागाच्या म्हाडा परीक्षेचा पेपर (MHADA Exam) फोडण्याचा प्रयत्न झाला आणि आता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या शिक्षण विभागाच्या शिक्षक भरती प्रक्रियेसाठी घेण्यात येणाऱ्या टीईटी (TET) परिक्षेच्या पेपरातही गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे महाविकासा आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) मोठी नामुश्की ओढावली आहे.

TET exam paper leak

धक्कादायक : गावकऱ्यांनी केला सरपंच पदाचा लिलाव...सर्वाधिक 44 लाखाची बोली

म्हाडा परिक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जी.ए. टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुखच्या पिंपरी-चिंचवड येथील घरातून 21 नोव्हेंबरला झालेल्या टीईटी परीक्षेसंदर्भातील कागदपत्रे पोलिसांना सापडली आहेत. विशेष म्हणजे ही परिक्षा घेण्याची जबाबदारी याच जी.ए टेक्नॉलॉजी या खासगी कंपनीकडे होती. मात्र, त्यांनीच या परिक्षेत गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

याबरोबरच या जी.ए. टेक्नॉलॉजी कंपनीकडे राज्यातील वीस पोलीस भरती परिक्षा प्रक्रियेचीही जबाबदारी देण्यात आली होती. हा गैरव्यवहार समोर आल्याने आता या कंपनीकडून राबवण्यात आलेल्या सगळ्याच भरती प्रक्रियेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. पेपर फुटीचा तपास करणाऱ्या सायबर पोलिसांना तपास करत अलतांना अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या सर्वच परिक्षांबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

TET exam paper leak

म्हाडा पेपरफुटीत मुख्यमंत्री आव्हाड, टोपेंबाबत पक्षपात करत आहेत काय? भाजपचा सवाल

सैन्य भरतीचा पेपर फुटल्याचा तपास करणाऱ्या मिल्ट्री इंटेलिजन्सला या पेपर फोडण्यात सहभागी असलेले आरोपी हे राज्यातील आरोग्य भरतीच्या पेपर फोडण्यातही सहभागी असल्याचे समोर आले होते. यानंतर आरोग्य भरतीचा पेपर फुटीचा तपास करणाऱ्या पुणे सायबर पोलिसांना म्हाडाचा पेपर फुटणार असल्याची माहिती मिळाली. यानंतर लगेचच ही परिक्षा सरकारला रद्द करावी लागली होती. आता हा तपास करत असतांना झालेल्या टीईटी परिक्षेचे सुद्धा कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागल्याने याही परिक्षेत गैरव्यहार झाल्याचे समोर आले आहे. याबाबत यामध्ये दोषी असलेला जी.ए. टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुखला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

तपासा दरम्यान पोलिसांना देशमुखच्या घरातून टीईटी परीक्षेची कागदपत्रे आणि काही विद्यार्थ्यांची ओळखपत्रे सापडली आहेत. त्यामुळे आधीच लांबलेली शिक्षक भरती प्रक्रिया ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या देशमुखच्या जी.ए. टेक्नॉलॉजी कंपनीकडे राज्यातील पुणे शहर व ग्रामीण, औरंगाबाद ग्रामीण, सांगली, सातारा, कोल्हापूर, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर, वर्धा, भंडारा, औरंगाबाद शहर, औरंगाबाद कारागृह, सोलापूर आयुक्तालय यासोबत अन्य काही परीक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

TET exam paper leak

वर्ष उलटलं..बारा आमदारांची नियुक्ती नाही, हे लोकशाहीत बसतं का?

खाजगी कंपन्यांना परीक्षा घेण्याचे काम देणे हे धोकादायक ठरत असून राज्य सरकारने आपल्या परिक्षा या लोकसेवा आयोगाला सक्षम करत त्यामार्फत घ्यावी, अशी मागणी शैक्षणिक क्षेत्रातून होत आहे. याबरोबरच स्थानिक प्रशासनाकडून राबवण्यात येणारी भरती प्रक्रिया सुद्धा अनेकदा वादात सापडली आहे. यामुळे रात्रंदिवस अभ्यास करून परिक्षेला बसणाऱ्या परिक्षार्थी हे नकारत्मक विचार करत असून त्यांचा शासन व प्रशासनावरील विश्वास उडत चालला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com