दिवाळीनिमित्त वीज कर्मचाऱ्यांना गुड न्यूज!

वीज कंपन्यांमधील सर्व कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी घेतला आहे.
Dr. Nitin raut
Dr. Nitin rautSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्य सरकारच्या वीज कंपन्यांमधील (MSEB) सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सानुग्रह (अनुदान बोनस) देण्याचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी घेतला आहे. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वीज कंपन्यांमधील वर्ग एक ते चतुर्थ श्रेणीतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना १२ हजार तर सहायक कर्मचाऱ्यांना ७ हजार २०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा डॉ. राऊत यांनी या बैठकीच्या समारोप प्रसंगी केली.

Dr. Nitin raut
दोन मामांच्या पाठपुराव्याला यश, शेतकऱ्यांच्या वीज कनेक्‍शन तोडणीला अखेर स्थगिती

सुरुवातीला वर्ग १ व २ च्या अधिकारी यांना वगळून १० हजार सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी ठेवला. मात्र, कामगार संघटनांनी या प्रस्तावाशी असहमती व्यक्त करून ऊर्जामंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. कामगार संघटनांशी चर्चा केल्यावर व त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर डॉ. राऊत यांनी ऊर्जा विभागाच्या प्रस्तावात गेल्या वर्षीच्या दिवाळीप्रमाणे याही वर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा केली.

या बैठकीला सर्व संघटनांचे पदाधिकारी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे हे उपस्थित होते.

कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावली.

"वीजबिलाची प्रचंड थकबाकी, शासनाकडून पाणीपुरवठा, पथदिवे यांच्याकडून न मिळालेले अर्थसहाय्य तसेच, कोळसा कंपनीची थकबाकी, वीज निर्मिती करणाऱ्या शासकीय व खासगी कंपन्यांची प्रलंबित देयके, कृषीपपांची नगण्य वीज वसुली इत्यादी कारणांमुळे सध्या तिन्ही कंपन्या अत्यंत बिकट अशा आर्थिक संकटातून वाटचाल करत आहे, अश्या परिस्थितीत आर्थिक परिस्थितीचे भान ठेवून सानुग्रह अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे," असे डॉ राऊत यांनी यावेळेस सांगितले.

Dr. Nitin raut
नाना पटोलेंच्या या खुलाश्यानंतर नितीन राऊत खूष होणार!

गेल्या दीड वर्षात कोरोना साथीमुळे उद्योग धंदे व व्यवसाय दीर्घकाळ बंद राहिल्याने तिन्ही वीज कंपन्यांच्या महसूलावर वाईट परिणाम पडला आहे. यात अधिकची भर म्हणून निसर्ग, तौक्ते चक्रीवादळे, अतिवृष्टी व महापुरामुळे वीज यंत्रणेचे मोठे नुकसान होऊन आर्थिक स्थिती खालावली आहे, याकडेही त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

"कोरोना काळात तिन्ही कंपन्यांतील अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या जीवाची बाजी लावून महाराष्ट्रातील जनतेला अखंडित वीजपुरवठा दिला, तसेच, महापुराच्या अभूतपुर्व संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत केला, अशा शब्दांत त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार यांचा गौरव केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com