महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला सर्वाधिक लोकप्रिय तर, सर्वोत्तम चित्ररथाचा मान या राज्याला..

यावर्षी १२ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे एकून २१ चित्ररथांनी (Tableau) संचलनात सहभाग घेतला होता.
Maharashtra Tableau
Maharashtra TableauSarkarnama

पुणे : दरवर्षी प्रमाणे दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने (Republic Day 2022) राजपथावरच्या संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांपैकी (tableau) यंदा उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला (UP Tableau) यंदाचा सर्वोत्तम चित्ररथ म्हणून मान मिळाला आहे. तर, यंदा जैवविविध मानके ही थीम घेऊन या संचलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथालाही (Maharashtra Tableau) सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच, सीआयएफच्या (CISF) चित्ररथाला सर्वोत्तम सेंट्रल आर्म पोलीस फोर्समधील चित्ररथ म्हणून सन्मानित करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. यावर्षी १२ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे एकून २१ चित्ररथांनी संचलनात सहभाग घेतला होता.

Maharashtra Tableau
राजकारण तापलं : योगींसाठी अमित शहा पोहचले थेट निवडणूक कार्यालयात

एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. भारतीय नौदलाच्या चित्ररथाला सर्व सेवा दलांमधील सर्वोत्तम चित्ररथाचा मान मिळाला असून या गटामधील सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ म्हणून हवाई दलाच्या चित्ररथाला मान मिळाला आहे. मंत्रालयांच्या चित्ररथांपैकी शिक्षण मंत्रालय आणि नागरी उड्डयन मंत्रालयाच्या चित्ररथांना पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. यंदाच्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये वाराणसी काशी विश्वनाथ धामचा देखावा साकारण्यात आला होता. तर महाराष्ट्राच्या चित्ररथात साताऱ्यातील 'कास' पठार दाखवण्यात आला होता आणि जैवविविध मानके ही थीम ठेवण्यात आली होती यास मोठी लोकप्रियता मिळाली आहे. मात्र, सर्वोत्तम चित्ररथ म्हणून उत्तर प्रदेशाच्या चित्ररथाला मान मिळाला आहे.

महाराष्ट्राच्या चित्ररथावर पाच 'जैवविविधता मानके' दाखवण्यात आली होती. यामध्ये वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश होता. १५ प्राणी आणि २२ वनस्पती व फुले या चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आले होते. चित्ररथासाठी तयार करण्यात आलेल्या गाण्यामार्फत झाडे लावा, झाडे जगवा हा संदेशही देण्यात आला होता. चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर यांची तर, चित्ररथाच्या गाण्याला आवाज गायक सुदेश भोसले यांनी दिला आहे.

Maharashtra Tableau
मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे होताहेत घटस्फोट! अमृता फडणवीसांचा दावा

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या आधी केंद्र सरकारने महाराष्ट्रासह केरळ, पश्चिम बंगाल व बिहारच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या. याबाबत शीख फॅार जस्टीस या संघटनेने प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रस्ता अडवण्याची धमकी देण्यात आल्याचे कारण सांगत २६ जानेवारीला मोदींना राजपथावर जाऊ देणार नाही. तसेच, इंडिया गेटवर जाण्यापासूनही त्यांना रोखले जाईल, असा इशारा या संघटनेने दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या बातम्यामध्ये काही तथ्य नसून हा खोडसाळपणा असल्याचे सांस्कृतिक विभागाच्या वतीने यावेळी स्पष्ट केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com