मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे होताहेत घटस्फोट! अमृता फडणवीसांचा दावा

मुंबई महापालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागले आहे.
Amruta Fadnavis
Amruta FadnavisSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आता महापालिकेला लक्ष्य केले आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीसह इतर समस्यांचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस यांची पत्नी म्हणून नव्हे तर सामान्य स्त्री म्हणून बोलत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीआधी सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर जोरदार टीका सुरू आहे. यात आता अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. त्या म्हणाल्या की, मी फडणवीसांची पत्नी म्हणून नव्हे तर सामान्य स्त्री म्हणून बोलत आहे. मी दररोज एखाद्या सामान्य नागरिकासारखी बाहेर पडते. वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा मलाही त्रास होतो. वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होत आहेत कारण आपण कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकत नाही.

Amruta Fadnavis
नवरा-बायकोच्या भांडणात पोलीस हवालदारानं मागितली लाच अन् हातात पडल्या बेड्या

मुंबईत अनेक प्रश्न आहेत. याचबरोबर मेट्रो आणि एसटी कर्मचाऱ्यांचाही मुद्दा आहे. याकडे सरकार लक्ष देत नाही. सरकारचे लक्ष खिसे भरण्यावर आहे. त्यामुळे सरकारवर टीकाही होणारच. मुंबईतील प्रश्नांवर सरकारने लक्ष द्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले. अमृता फडणवीस यांच्या टीकेमुळे मुंबईतील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र आणखी वाढण्याचे संकेत आहेत.

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरोगामी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे पुरोगामी आहेत. भाजप आणि संघाकडून स्त्रियांचा मान ठेवला जातो. मी अराजकीय व्यक्ती आहे पण भाजप आणि संघाच्या जवळ आहे. स्त्रियांना सर्वाधिक आदर देणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आहे, असेही फडणवीस म्हणाल्या.

Amruta Fadnavis
बंडातात्यांवर अमृता फडणवीस भडकल्या अन् म्हणाल्या...

बंडातात्या कराडकरांच्या वक्तव्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, स्त्रियांनी आधीच आपल्या देशात खूप भोगले आहे. त्यामुळे स्त्रियांवर टिप्पणी करणे आणि त्यांच्या खासगी आयुष्यावर बोलणे चुकीचे आहे. त्यापासून दूर राहायला हवे. आपल्या देशात नेहमी हेच घडत आले आहे. कुणी काही बोलले की त्यावर आपण आंदोलन करतो. खरे तर या गोष्टी मानसिकतेशी संबंधित आहे. काय बोलावे आणि काय बोलू नये, हे आपणच ठरवावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com