नारायण राणे मांडणार गृहमंत्री शहांकडे गाऱ्हाणे

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच भाजपने (BJP) विजय मिळवला आहे.
Narayan Rane & Amit Shah

Narayan Rane & Amit Shah

Sarkarnama

कणकवली : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीत अखेर भाजपची (BJP) सरशी झाली असून भाजपने महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) पराभव केला आहे. विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयावर पत्रकारांशी संवाद साधला व महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर त्यांनी सडकून टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले, आता बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काही योजना सुरु करता येतील का, यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहे. त्यावेळी मी येथे घडलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घालणार असून या निवडणुकी दरम्यान नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याबाबत जे काही घडले तसेच, या काळात पोलीस यंत्रणेने कसे काम केले, कोर्टकचेऱ्या कशा अनुभवायला मिळाल्या, या सर्व गोष्टी आपण शहांना सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Narayan Rane &amp; Amit Shah</p></div>
36 मतं मिळत नाहीत अन् विधानसभेच्या गोष्टी करतो! राणेंचा सावंतांना टोला

राणे म्हणाले, ही निवडणूक जबरदस्तीने कायद्याचा वापर करुन जिंकण्याचा महाविकास आघाडीकडून प्रयत्न झाला. तसेच, नितेश राणेंच्या जामीनावर चार-चार दिवस सुनावणी चालते. वरिष्ठ पोलीस अधिकारी सिंधुदुर्गात ठाण मांडून बसतात तरीही आपण यांनी पुरून उरलो आणि आता केंद्रापर्यंत पोहोचलो आहे. विधानसेभेची गोष्ट करणारांनी 36 मते मिळवता आले नाही, अशा शब्दात त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतला.

गेल्या पत्रकारपरिषदेत नितेश राणें बद्दलच्या त्यांच्या वक्तव्यामुळे पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. आज मात्र राणे यांनी नितेश राणेंबद्दल जपूनच बोलतांनी दिसले.

<div class="paragraphs"><p>Narayan Rane &amp; Amit Shah</p></div>
बारामतीला यापुढे कर्ज देणार नाही, असे नारायण राणे का म्हणाले?

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत झालेला हा विजय हा माझा एकट्याचा नसून तो भाजपचा आहे. जिल्ह्यातील देवदेवता आणि जनतेच्या आशीर्वादाने जिल्हा बँकेत भाजपची सत्ता आली. आता पुढचे लक्ष्य महाराष्ट्राची सत्ता मिळवणे, हेच असेल, असे राणे म्हणाले. तसेच, आगामी काळात कोकणातील तिन्ही जिल्ह्यांत विधानसभेत आणि लोकसभेत भाजपचाच विजय होईल, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे लगान टीम नको, अश्या शब्दात त्यांनी महाविकास आघाडी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com