ठाकरे सरकारच्या पाठीवर उच्च न्यायालयाची थाप!

कोरोनाकाळातील (Covid-19) विविध समस्यांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज उच्च न्यायालयात (High Court) सुनावणी झाली.
Mumbai high court
Mumbai high court

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : राज्यातील कोरोना (Covid-19) काळात महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) चांगले काम करता आले नाही, अशी विरोधकाकडून सातत्याने टीका होत असताना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) मात्र राज्यसरकारचे कोरोना काळातील केलेल्या कामाचे कौतुक केले आहे. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र हा अग्रस्थानी राहिला, असे आम्ही जाहीरपणे सांगू शकतो, अशा शब्दात न्यालयाने ठाकरे सरकारची पाठ थोपटली आहे.

Mumbai high court
आरोग्य भरती घोटाळ्यातील आरोपी इतरही परीक्षांच्या पेपरफुटीत? तपासाकडे लक्ष

कोरोनाकाळातील विविध समस्यांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज (ता.13 डिसेंबर) मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी कोरोना काळात राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. आम्ही हे जाहीरपणे सांगू शकतो की, महाराष्ट्र हा कोरोनाचा सामना करण्यात अग्रस्थानी राहिला आहे. आता आपण तो वाईट काळ व दिवस विसरायला हवे, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांनी म्हटले. कोरोनाकाळातील विविध समस्यांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिका आज उच्च न्यायालयाने निकाली काढल्या.

Mumbai high court
हिंदू आहात तर मोगलांनी मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करा : चंद्रकांतदादांचे आव्हान

राज्यातील विविध भागातील रूग्णालयातील खाटांची संख्या, ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीरचा तुटवडा, कोरोना प्रतिबंधक लसीकरणातील त्रृटी व अन्य समस्याबाबत स्नेहा मरजादी यांच्यासह अन्य काही जणांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या होत्या. यापुर्वी सुद्धा उच्च न्यायालयाने याचिकांवरील सुनावणी दरम्यान राज्य सरकार व मुंबई महापालिकेने कोरोना काळात केलेल्या कामांचे कौतुक केले होते. तर, काही वेळा कठोर सुचना देखील केल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com