पोलिस तपासताहेत, ‘ओ शेठ’ कुणाचे? नाशिकचे... की पुण्याचे?

सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेले गाणे म्हणजे ‘ओ शेठ’. हा ‘ओ शेठ’ कोण?.
O Sheth...
O Sheth...Sarkarnama

नाशिक : सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेले गाणे म्हणजे ‘ओ शेठ’. हा ‘ओ शेठ’ कोण?. कोणाचा? असा प्रश्न अनेकांना पडतो. हाच प्रश्न आता थेट पोलिसांत पोहोचला आहे. ‘ओ शेठ’ कुणाचे नाशिकचे की पुण्याचे हा श्रेयवाद रंगल्याने पोलिसांनाही त्याचा निवाडा करणे अवघड बनले आहे. त्यामुळे गाण्याप्रमाणेच ही चर्चा व वाद देखील सुसाट सुटला आहे.

नाशिक रोड पोलिस ठाण्यात हा वाद पोहोचला. तसा हा प्रश्न दिवानी स्वरूपाचा आहे तसाच फौजदारीही आहे. त्यामुळे नेमके करावे काय, ही सगळ्यांची अडचण झाली आहे. मराठी रसिकांना गुणगुणायला लावणाऱ्या ‘ओ शेठ’ गाण्याच्या श्रेयवादावरून येथील रहिवासी संध्या केशे आणि पुणे येथील गायक उमेश गवळी यांच्यात श्रेयावादाची लढाई रंगली असून, हा विषय सध्या चर्चेचा ठरतो आहे. ‘ओ शेठ’ हे गाणे जूनपासून हीट होत आहे. गाण्याची निर्मिती होताना दसक येथील रहिवासी संध्या केशे यांनी या गाण्याचे लिखाण केले होते आणि परभणी येथील डीजे स्टार प्रणिकेत खुने यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले होते. हे गाणे पुणे येथील गायक उमेश गवळी यांनी गायले होते. या गाण्याला महाराष्ट्रातल्या रसिकांनी अगदी डोक्यावर घेतले. हळूहळू लोकप्रियता वाढू लागली आणि श्रेयवादावरून लढाई सुरू झाली.

O Sheth...
राज्य सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल !

संध्या केशे हिने हे गाणे प्रनिकेत खुने यांच्यामार्फत उमेश गवळी यांच्याकडे गाण्यास पाठवले होते. उमेश आणि संध्यामध्ये याचा कागदोपत्री काहीच करार झाला नव्हता. संगीतबद्ध झालेले गाणे तयार करून गवळी यांनी यू-ट्यूबवर हे गाणे अपलोड केले. त्यानंतर या गाण्याला लाखो लाइक मिळायला लागले. यू-ट्यूबकडून त्यांना मानधनही मिळाले. पंधरा दिवसांपासून या गाण्याच्या श्रेयवादावरून संध्या केशे आणि उमेश गवळी यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगत आहे. संगीतकार अनिकेत घुले यांच्या डीजे प्रनिकेत ऑफिशियल या यू-ट्यूब चॅनलवर अपलोड केलेले गाणे गायक उमेश गवळी यांनी यू-ट्यूबला स्ट्राईक (बंद) केले आहे. गाण्याला मिळणाऱ्या प्रतिसादावरून ही श्रेयवादची लढाई सध्या पोलिसांपर्यंत पोचली आहे. उमेश गवळी यांनी पुणे पोलिसांना यासंबंधी अर्ज देऊन हरकत घेतली आहे. संध्या केशे यांनी गाण्याची कवयित्री मीच आहे. याचे लिखित पुरावे असून, पुरावे जनतेसमोर आणणार असल्याचे सांगितले आहे. या संदर्भात विविध राजकीय पक्ष, गायक संघटना प्राणिकेत खुने व संध्या केशे यांना मदत करण्यासाठी सरसावले आहेत.

O Sheth...
आजचा वाढदिवस...माणिकराव कोकाटे, आमदार (सिन्नर)

गाणे लिहून मी रजिस्टर केले आहे. व्हॉट्सॲप संभाषणातील पुरावेही आमच्याकडे आहे. पैसा, श्रेयवाद आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी उमेश गवळी यांनी पोलिस ठाण्याची पायरी चढली आहे. उमेश गवळी यांनी नाशिकला येऊन सामंजस्याने हा वाद मिटवावा. नाही तर पुढची कायदेशीर लढाई लढण्यास आम्ही तयार आहोत.

- संध्या केशे, कवयित्री

...

या गाण्याचे लिखाण संध्या यांचे आहे, मात्र हे गाणे प्रनिकेत, संध्या व मी अशा तिघांनी बनवले आहे. मला बदनाम करण्याचे संध्या यांचे षड्यंत्र असून, त्यांच्याविरुद्ध मी अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार आहे. हे केवळ पैशाच्या हव्यासापोटी चालले आहे. या संदर्भात पोलिसांना तक्रार अर्ज दिला आहे.

- उमेश गवळी, गायक, पुणे

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com