राज म्हणतात, `बाळासाहेबांनी मला जोडे दाखवले`

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांसमवेत काम करतानाच्या आठवणींना राज ठाकरेंनी उजाळा दिला. कार्यकर्त्यांना लोकसंग्रह वाढविण्याच आवाहन केले.
Raj Thakre
Raj ThakreSarkarnama

नाशिक : शिवसेनाप्रमुख (Shivsena Suprimo) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre) यांनी मला घराबाहेरचे जोडे (Shoes) दाखवले. जोडे दाखवून त्यांनी विचारलं हे काय आहे?. (What is This) मी म्हणालो जोडे आहेत. मात्र तेंव्हा ते म्हणाले `हे जोडे नाही, तर ही आपली संपत्ती आहे`

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख (MNS Chief) राज ठाकरे (Raj Thakre) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांसमवेत काम करतानाच्या आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांना लोकसंग्रह वाढविण्याच आवाहन केले.

Raj Thakre
Raj ThakreSarkarnama

ते म्हणाले, लोकांना नावाने ओळखता यायला हव,तरच लोक तुम्हाला ओळखतील. शाखा अध्यक्षांनंतर गटाचे अध्यक्ष नेमले जाणार आहेत. तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या सांगितल्या जातील. तुम्ही लोक नमस्कार देखील हात आखडल्या सारखे करता, तसं करू नका लोकांना वाटलं पाहिजे हा आपला आहे. उद्यापासून शाखेची जागा शोधा. शाखा कुठे असावी? हे विचारपूर्वक ठरवा. शाखाप्रमुख शांतराम आमरे झाडाखाली बसलेले असायचे. तिकडे लोक गर्दी करायचे अस काम करा.

गृहमंत्र्यांना `ईडी`ची भीती नाही

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीची कारवाई सुरु आहे. त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. मात्र अद्याप ते सापडत नाहीत. कारण त्यांना ईडीची भीती नाही. त्यांनी `ईडी`ला वेड्यात काढलं आहे.

फक्त आमचीच होर्डिंग्ज नको का?

नाशिक शहरात पोलिसांनी श्री. ठाकरे यांच्या स्वागताचे फलक काढले. यासंदर्भात त्यांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग्ज लावायला नको. याबाबत मी सहमत आहे. त्याने शहर विद्रुप होतं. मात्र, झालं असं की फक्त आमचीच लावायची होर्डिंग्ज लावायची नाही का? याचाही विचार व्हायला हवा.

Raj Thakre
`शरियत` सारखा कायदा महाराष्ट्रात आणा!

समन्वयक नेमणार

महापालिका निवडणुकीबाबत त्यांचा दौरा होता. त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विविध सूचना केल्या. ते म्हणाले, हा दौरा संटनात्मक नेमणूक करण्यासाठी होता. निवडणुकांना अजून वेळ आहे. मी १५ दिवसांनी मी पुन्हा येणार. पक्षात समन्वयक या नवीन पदाची निर्मिती करण्यात येईल.

प्रभागरचनेला आव्हान द्या!

राज्य शासनाने महापालिका प्रभागरचना जाहीर केली. त्याबाबत त्यांनी शासनावर परखड टिका केली. ते म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २०१२ मध्ये दोन सदस्यांचा प्रभाग केला. भाजप-सेनेनं त्यानंतर चार सदस्यांचा प्रभाग केला. मुळात देशात अशी पद्धत कुठेच नाही. सत्ता काबीज करण्यासाठी हा सत्ताधाऱ्यांचा घाट आहे. हे लोक जनतेला गृहीत धरतात. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यायला हवी. हा नुसता खेळ सुरू आहे. फक्त महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेलाच प्रभाग पद्धत का?. लोकांनी त्याला कोर्टात चॅलेंज करायला हवे.

पर्यावरण महत्त्वाचेच

कार्यकर्ते नागिरकांनी वृक्षारोपण करावा, असा आग्रह त्यांनी व्यक्त केला. प्रत्येकाने आपल्या, आपल्या भागात झडे लावावेत. झडे आपले अस्तित्व आहे. प्रत्येकाला ते दिसलायला हवे. कारण झाडे आपलं अस्तित्व दाखवतात.

अजित पवारांकडून माझं कौतुकच

उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमात बोलताना म्हणाले, पैसे न देता जात असतील ते लोक राज ठाकरे यांचे भाषण ऐकायला जातात. हे माझं नाही तुमचं कौतुक आहे. आपल्या काळात एकही भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाले नव्हते. तो आपला प्रामाणिकपणा होता.

Raj Thakre
राज ठाकरेंचा नाशिक प्रवास खडतर ...!

स्पष्टवक्ते व्हा, उद्धट नव्हे!

कार्यकर्ते लोकांच्या प्रश्नावर आक्रमक असले पाहिजेत. त्यांनी समाजाच्या प्रश्नावर स्पष्टवक्ता असले पाहिजे. मात्र असे करताना स्पष्टवक्ता आणि उद्धटपणा यात फरक आहे. हे समजून वागले पाहिजे. पक्षाच्या विस्तारावर माझा भर असेल. त्यासाठी पुढच्या आठवाड्यात पुन्हा मी येईन. तेव्हा कार्यकर्त्यांना आपलं काम काय हे सांगेल. जो आरखाडा देईल त्या प्रमाणे कार्यकर्त्यांना काम करावं लागेल.

शरीयतसारखा कायदा हवा

महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्याला आपल्याकडची ढिसाळ व्यवस्था कारणीभूत आहे. कायद्याचा धाक, भिती राहिली नाही. यासंदर्भात शरियत सारखा कायदा आणा मगच महिलांवर अत्याचार थांबतील. कायद्याची भीती निर्माण होईल, असे ते म्हणाले.

मुंबईची निवडणूक मॅनेज?

ते म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाने काल प्रभाग रचना जाहीर केली. त्यात मुंबई महापालिकेसाठी एक सदस्यी तर राज्यात अन्यत्र तीन सदस्यीय रचना केली आहे. हा सर्व त्यांचा राजकीय डाव आहे. निवडणूक मॅनेज करण्यासाठी एक सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय सरकारने घेतला का? असा प्रश्न पडतो.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com