धोका वाढला; राज्यात येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट

कोरोना (Covid-19) रुग्णसंख्येत राज्यात सातत्याने वाढ होत आहे.
Uddhav Thackeray & covid 19 

Uddhav Thackeray & covid 19 

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : राज्यात कोरोनाच्या (Covid-19) केसेसमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात तिसरी लाट (3rd wave) येऊ शकते असा धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज (ता.24 डिसेंबर) मिडिया स्टॅण्ड येथे दिली.

<div class="paragraphs"><p>Uddhav Thackeray &amp; covid 19&nbsp;</p></div>
तुकाराम सुपेकडील घबाड संपता संपेना; जप्त केलेली रक्कम पावणेचार कोटींवर !

बुधवारी (ता.22 डिसेंबर) झालेल्या कॅबिनेटमध्ये कोरोनाचा आढावा घेत असताना कोरोनाची माहिती देण्यात आली. ओमीक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच जगात एक नवीन डेलमायक्रोनचा वायरस आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (ता.24 डिसेंबर) टास्क फोर्सची बैठक घेणार असल्याचे मलिकांनी सांगितले. त्यामुळे काही निर्बंध लावायचे असतील तर, ते आज काम होईल. तिसरी लाट जानेवारी ते मे महिन्यापर्यंत येऊ शकते, असेही ते यावेळी म्हणाले.

मलिक म्हणाले, बंगाल, तामिळनाडूची निवडणूक झाल्यानंतर देशात दुसरी लाट आली होती. त्यामुळे हायकोर्टाने तिसरी लाट येऊ शकते म्हणून दोन-तीन महिने निवडणुका पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, निवडणूका पुढे ढकलण्याच्या नावाखाली ज्या पाच राज्यात निवडणूका आहेत तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न केंद्रसरकार करुन पंजाबमध्ये सत्ता ताब्यात घेणे त्यांना शक्य होऊ शकते. तसेच, निवडणूका पुढे ढकलणे हे वेगळे संकट देशात निर्माण होऊ शकते. त्यामुळे काही निर्बंध घालून मर्यादित डोर टू डोर प्रचार कोरोना नियम पाळून निवडणूका होऊ शकतो यावर केंद्रसरकारने विचार करावा, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.

<div class="paragraphs"><p>Uddhav Thackeray &amp; covid 19&nbsp;</p></div>
रामदास कदमांना विधान भवनाच्या गेटवरच अडवलं! शिवसेना नेत्यांची पळापळ

टास्क फोर्सच्या कालच्या बैठकीत काय झाल?

  • राज्यभरात रात्रीची जमावबंदी लागु होणार

  • ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत

  • आज दुपारपर्यंत राज्यशासन नवी नियमावली जाहिर करणार

  • ३१ जिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर रात्रीची जमावबंदी

  • फटाके फोडता येणार नाहीत, आतिषबाजी नाही

  • लग्नसमारंभ, कार्यक्रम यांवरही निर्बंध

  • १०० जणांनाच परवानगी, आधी ही मर्यादा २०० होती

बंदीस्त जागेतील कार्यक्रम

  • समारंभ , लग्न, इतर कार्यक्रम यांकरता १०० लोकांनाच परवानगी २५ टक्के किंवा १०० यामध्ये जी कमी ती मर्यादा लागु

  • ओपन ५० टक्के किंवा १०० यामध्ये जी कमी ती मर्यादा लागु१०० लोकांनाच परवानगी

  • रेस्टरंट ५० टक्के क्षमतेनच सुरु राहणार असून प्रशासनाचे आता हॉटेल, रेस्टॉरंटकडे बारकाईने लक्ष असेल

मुंबईची स्थिती काय

  • ३ महिन्यांनंतर मुंबईत अचानक स्पाईक

  • ऑक्टोबरमध्ये मुंबईतील दरदिवशी वाढणारी रुग्णसंख्या ५५०-६०० होती.

  • ३ महिन्यांनंतर रुग्णसंख्यावाढ बघायला मिळत आहे.

  • मुंबईत दरदिवसाला 45 हजार टेस्टींग होत आहेत

  • काल बैठकीत टास्क फोर्सचा भर कशावर होता?

जलद लसिकरण मोहिम, बुस्टर डोस बाबत केंद्राकजे पाठपुरावा करणे, किमान हेल्थ/फ्रंटलाईन वर्कर्सला बुस्टर डोस मिळावा, केंद्राकडे लहानमुलांच्या लसिकरणासाठी पाठपुरावा करावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com