मुंबई : हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारी तिसरा दिवस असून शिवसेनेचे नेते रामदास कदम विधिमंडळ कामकाजासाठी विधान भवनात आले होते. मागील काही दिवसांपासून परिवहन मंत्री अनिल परब आणि कदमांमध्ये जोरदार राजकीय वाद सुरू आहे. त्यातच कदम आज विधान भवनात येत असताना त्यांना गेटवरच अडवण्यात आलं. हे समजताच शिवसेनेच्या इतर नेत्यांची पळापळ झाली.
रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत अनिल परब (Anil Parab) यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यामुळे शिवसेने (Shiv Sena) मध्ये त्यांच्याविरोधात रोष असल्याची चर्चा आहे. शिवसेनेतून काढले तरी अखेरपर्यंत शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून राहीन, असंही कदम म्हणाले होते. त्यानंतर ते शुक्रवारी विधान भवनात (Assembly Winter Session) दाखल झाले. पण त्यांना कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसल्याने गेटवरच अडवण्यात आले.
रिपोर्ट दाखविल्याशिवाय प्रवेश नसल्याचे सांगताच भाई चिडले आणि प्रवेश देण्याचा आग्रह सुरूच ठेवला. पोलिसांनी भाईंना अडविल्याचा निरोप शिंदे, पाटील यांच्यापर्यंत पोचला; लगेचच आमदारांसह हे दोघे पोलिसांकडे आले. मात्र, पोलिसांशी चर्चा करूनही ते भाईना प्रवेश देण्यास तयार नव्हते. शेवटी 'अॅण्टीजेन' करण्याचा पर्याय निवडून त्यानुसार भाईची टेस्ट झाली. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि त्यानंतरच्या काही • मिनिटांतच भाईना प्रवेश मिळाला. सुरक्षिततेचे कारण देत का होईना पण पोलिस यंत्रणेने राज्याच्या माजी मंत्र्यालाच अडविल्याची चर्चा रंगली होती.
दरम्यान, कोरोना पसरत असूनही विधान भवनात मंत्री, आमदार तोंडाला मास्क न बांधताच फिरत असल्यावरून संतापलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुरूवारी विधानसभेत बेजबाबदारांची कानउघाडणी केली. त्याला चोवीस तासही उलटले नाहीत, तोच शिवसेनेचे नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी मास्क न लावताच विधान भवनात आले. माध्यमांचे कॅमेरे आपल्याकडे वळल्याचे पाहून शिंदेंनी 'पीए' कडून मास्क घेतला आणि तो तोंडाला बांधून विधीमंडळात गेले. आवारात काय तर विधीमंडळाचे कामकाज सुरू होताच विधानसभेत काही आमदारांनी मास्क घातला नसल्याकडे अजित पवारांनी पुन्हा लक्ष वेधले आणि मास्क घालण्याची विनंती केली.
कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढण्याच्या शक्यतेने या अधिवेशनात (Assembly Winter session) खबरदारी म्हणून उपाय केले आहेत. त्यामुळे लसीकरण (Vaccination) आणि कोरोना चाचणीशिवाय विधीमंडळात 'नो एन्ट्री' आहे. परंतु, सभागृहात काही बहुतांशी मंत्री, आमदार मास्क न लावत नसल्याचे दिसून येत आहेत. विधीमंडळाच्या आवारातही फिरताना मास्क न लावणाऱ्या मंत्री, आमदारांच्या बेशिस्तपणावर बोट ठेवत, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुरुवारी सभागृहात नाराजी व्यक्त केली.
मास्क नसेल; मलाही आत घेऊन नका, असे सांगत त्यांनी काळजी घेण्याचे आवाहनच केले. त्यामुळे शुक्रवारपासून विधीमंडळात येणारे मंत्री, आमदार आणि इतर मंडळी मास्क बांधूनच येण्याची आशा होती. मात्र, शुक्रवारी सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी विधान भवनाच्या प्रवेशदारात आलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मास्क नव्हता. ते गाडीतून उतरून आवारात आले तरीही मास्क नसल्याचे दिसून आले. तेव्हा पुढेच गर्दी केलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचे कॅमेरे शिंदेंना टिपत होते. त्यावेळी सावध होऊन शिंदे यांनी 'पीए' मास्क घेतला. त्यानंतर मास्क बांधून मामध्यांशी न बोलताना ते विधीमंडळात गेले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.