Waqf Bill Passes: 'वक्फ'वर राष्ट्रपतींची सही होण्यापूर्वी काँग्रेसची आडकाठी; विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्याआधीच...

Congress on Waqf Bill: राज्यघटनेच्या आधारे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांना विरोध करणे सुरुच ठेवणार असल्याचे जयराम रमेश यांनी सांगितले. दुसरीकडे बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनीही या बिलावरुन मोदी सरकारला इशारा दिला आहे.
Waqf Board Bill Parliament
Waqf Board Bill Parliament Sarkarnama
Published on
Updated on

Congress vs Waqf Bill: लोकसभा आणि राज्यसभेतील प्रदीर्घ चर्चा, विरोधानंतर वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूरी दिल्यानंतर या कायद्याला मंजूरी मिळाली आहे. आता ते स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्यात येणार आहे. पण या विधेयकाला आडकाठी घालण्याचे काम काँग्रेसने केले आहे.

वक्फ विधेयकाला विरोध करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमकेचे अध्यक्ष एम के स्टालिन यांनी सांगितले आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी टि्वट करीत या विधेयकाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

Waqf Board Bill Parliament
Eknath Shinde: शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत एन्ट्री, पद वाटपाचा मुहूर्त कधी? जबाबदारी नसल्याने शिवसैनिक अस्वस्थ

काँग्रेस लवकरच या विधेयकाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. राज्यघटनेच्या आधारे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांना विरोध करणे सुरुच ठेवणार असल्याचे जयराम रमेश यांनी सांगितले. दुसरीकडे बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनीही या बिलावरुन मोदी सरकारला इशारा दिला आहे.

जर या बिलाचा दुरुपयोग केला तर आम्ही मुस्लिमांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, असे मायावतींनी म्हटलं आहे. वक्फ विधेयक दुरुस्ती करताना सरकारने जनतेला अजून वेळ देणे गरजेचे होते, असे मायावती म्हणाल्या.हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करीत जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत, आनंद व्यक्त केला आहे.

वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 लोकसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेतही मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने 128 मते पडली तर 95 सदस्यांनी विरोधात मतदान केले. वक्फ कायदा लागू होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.

"वक्फ बोर्ड ही एक वैधानिक संस्था आहे आणि ती धर्मनिरपेक्ष असली पाहिजे. या विधेयकामुळे एकाही मुस्लिमाचे नुकसान होणार नाही. कोट्यवधी मुस्लिमांना याचा फायदा होणार आहे," असा विश्वास राज्यसभेत वक्फ विधेयकावरील चर्चा पूर्ण झाल्यानंतर अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com