Eknath Shinde: शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत एन्ट्री, पद वाटपाचा मुहूर्त कधी? जबाबदारी नसल्याने शिवसैनिक अस्वस्थ

Nagpur Shivsena News Update: प्रवेश समारंभानंतर दोन तीन दिवसांत पद वाटप करून जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार होत्या. मात्र हा मुहूर्त टळला. त्यानंतर महिनाभर उपमुख्यमंत्री शिंदे हे अधिवेशनात व्यग्र होते.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यापूर्वी नागपूरमध्ये येऊन मोठे राजकीय ऑपरेशन केले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश समारंभ घेऊन त्यांनी विदर्भातही सेना जिवंत असल्याचे दाखवून दिले.

प्रवेश समारंभानंतर पक्षात प्रवेश केलेल्या एकालाही कार्यकर्त्याला पदांचे आणि जबाबदाऱ्यांचे वाटप केले नसल्याने मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे फक्त कार्यकर्त्यांचा विस्तार झाला परंतु कार्याचा झाल्याचे दिसून येत नाही.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेशाचे दोन कार्यक्रम नागपूर जिल्ह्यात घेण्यात आले होते. नागपूरमध्ये पूर्व विदर्भाचे समन्वयक किरण पांडवा यांच्या नेतृत्वात मेट्रो रेल्वे भवन येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमात मनसेच प्रदेश उपाध्यक्ष किशोर सरायकर यांच्यासह जिल्ह्यातील मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. सोबतच शेजारच्या वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथील वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल झाले.

Eknath Shinde
Ajit Pawar: अजितदादांच्या पदाधिकाऱ्यावर बलात्कार अन् धर्मांतराचा आरोप; चाकणकरांनी केल्या पोलिसांना 'या' महत्त्वाच्या सूचना

यात सरायकर यांच्यासह काँग्रेस एनएसयूआचे माजी अध्यक्ष सुमुख मिश्रा यांचाही समावेश आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांची आभार सभा कन्हान येथे घेतली होती. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे सेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजू हरणे या प्रमुख नेत्याने प्रवेश केला होता.

प्रवेश समारंभानंतर दोन तीन दिवसांत पद वाटप करून जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार होत्या. मात्र हा मुहूर्त टळला. त्यानंतर महिनाभर उपमुख्यमंत्री शिंदे हे अधिवेशनात व्यग्र होते. या दरम्यान, आमदार कृपाल तुमाने यांना रामटेक तर माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची नागपूरचे संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर गुढीपाडवाच्या दिवशी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील, असे सांगण्यात आले होते. मात्र हा मुहूर्तसुद्धा उलटून गेल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

Eknath Shinde
Supreme Court: सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांबाबत CJI संजीव खन्ना यांचा मोठा निर्णय; यशवंत वर्मा यांच्या शपथविधीला...

या सर्वांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. प्रवेश समारंभाच्यावेळी कोणालाच पदाचे आश्वासन देण्यात आले नव्हते. फक्त प्रवेश करा, आम्ही तुमचा मानसन्मान राखून पदे देऊन असे सर्वांना स्थानिक नेत्यांनी आश्वस्त केले होते.

नागपूर जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांचे आपसात पटत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. यातच विद्यमान संपर्क प्रमुखांच्या नेतृत्वात प्रवेश केलेले मोजकेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पद वाटप करताना एकमत होत नसल्याचे समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com