महाविकास आघाडीच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढले 

सत्तेत सहभागी असलो,तरी अद्याप सत्तेचा वाटा मिळालेला नाही.
Jogendra kawade.jpg
Jogendra kawade.jpg
Published on
Updated on

औरंगाबाद : पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (पीआरपी) संस्थापक अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.  ‘‘महाविकास आघाडीच्या Mahavikas Aghadi कार्यकाळात राज्यातील दलितांवर अत्याचार वाढल्याची खंत जोगेंद्र कवाडे Jogendra Kawade यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ‘पीआरपी’ सत्तेत सहभागी असला तरी दोन वर्षांपासून सत्तेचा वाटा न मिळाल्याने कवाडे यांनी नाराजीही व्यक्त केली.

सत्तेत सहभागी असले तरी अद्याप सत्तेचा वाटा मिळालेला नाही. यामुळे सत्तेत पाच टक्के वाटा द्यावा, अशा मागण्याचे पत्र काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात आले आहे. यासंदर्भात लवकर निर्णय न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकांवर याचा परिणाम दिसून येईल, असे कवाडे म्हणाले.  

खडसेंच्या नावाला कशी मान्यता द्यायची? : राज्यपालांपुढे पेच 
कवाडे यांनी महाविकास आघाडीतील सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींवर आरोप केले. ते म्हणाले, की बुलडाणा, जालना येथील दलितांवर झालेल्या अत्याचाराविरोधात पीडितांच्या हक्कासाठी उभे राहण्याऐवजी येथील लोकप्रतिनिधी आरोपीला मदत करत असल्याचे समोर आले आहे. महाड येथील पूरग्रस्त भागाचा दौरा करताना एका गावात दलित समाजातील नागरिकांवर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कारास नकार देण्यात आला, या विरोधात पोलिस पाटलाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

बीडमध्ये दलितांवर रोज अत्याचार होत आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी, सरकार व प्रशासन दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केले. पक्षाच्या वतीने आता या विरोधात समाजाला आधार व पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात रिपब्लिकन गार्ड तयार करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

बैलगाडा शर्यतीसाठी बाळा भेगडेंचे फडणवीसांनाच साकडे
पिंपरी : बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होण्यासाठी बैलगाडा मालकांनी व त्यांच्या संघटनेने आमदार, खासदारांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देताच लोकप्रतिनिधी आता सक्रिय झाले आहेत. शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ओझर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे बैलगाडामालक व संघटनेच्या प्रतिनिधीची नुकतीच बैठक घेतली. त्याला मावळचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील शेळके उपस्थित होते. त्यानंतर मावळचे माजी आमदार व माजी मंत्री बाळा भेगडे Bala Bhegade यांनी त्यापुढे एक पाऊल टाकले आहे. आज (ता.१७) सकाळी ते याच मागणीसाठी बैलगाडा मालकांना घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  Devendra Fadnavis यांना पुणे विमानतळावर भेटणार आहेत.  
  Edited by : Mangesh Mahale 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com