वंदना चव्हाणांसह तीन खासदारांचा राज्यसभेच्या तालिकेवर जाण्यास नकार

संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांना बोलू दिले जात नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
1Vandana_Chavan_profile_1_final_0.jpg
1Vandana_Chavan_profile_1_final_0.jpg
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : राज्यसभेत पेगासस हेरगिरी, कृषी कायदे आणि इंधन दरवाढीवर फलक फडकावित विरोधी पक्षांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता. संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता.  या पार्श्वभूमीवर वंदना चव्हाण आणि त्यांच्या दोन सहकारी खासदारांनी याचा निषेध करण्यासाठी सभागृहाचे सभापती होण्यास नकार दिला आहे. संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांना बोलू दिले जात नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.  

याबाबत वंदना चव्हाण म्हणाल्या, ''राज्यसभेत गोंधळ सुरू असताना मी काम करणे नैतिकदृष्टया योग्य नाही. तीनही पीठासीन अधिकाऱ्यांनी उपसभापती हरिवंश यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली भूमिका मांडली. उपसभापतींनी आमची बाजू समजावून घेतली आहे. लवकरच परिस्थिती सुधारेल असा विश्वास आहे.''

आशाताई बुचकेंचं अखेर ठरलं ; भाजपमध्ये प्रवेश करणार
बिजू जनता दलाचे भर्तृहरी महताब हे पीठासीन अधिकारी आहेत. ते म्हणाले, ''या तीन नेत्यांचा निर्णय योग्यच आहे. सभापतींच्या अनुपस्थित सभागृह चालविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र, सरकारकडून अनेक गोष्टींवर चर्चा होत नसल्याने खासदार निषेध करत आहेत. त्यामुळे या परिस्थितीत त्यांच्यावर सभागृह चालविण्याची सक्ती करता येणार नाही.''

राज्यसभेचे सभापती किंवा उपसभापती आणि लोकसभा अध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये 12 पीठासीन अधिकारी असतात.  या १२ पीठासीन अधिकाऱ्यांमध्ये  वंदना चव्हाण, कॉँग्रेसचे खासदार एल हनुमंथैया आणि तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) सुखेंदू शेखर रे यांचाही समावेश आहे. मात्र, या तिघांनी पीठासीन अधिकारी होण्यास नकार दिला आहे.
  
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांकडून दररोज गोंधळ घातला जात होता. विरोधी खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये (सभापतींसमोरील मोकळी) घुसत घोषणाबाजी केली होती.  

भाजपच्या मंत्र्याला शिवसेनेचे माजी आमदाराकडून शुभेच्छा... 
डोंबिवली : केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील  kapil patil यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्र आज काढली जाणार आहे. त्यामुळे भाजपकडून सर्व ठिकाणी बॅनरबाजी केली जात आहे. मात्र, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी लावलेल्या बॅनरवर आता चांगलीच चर्चा रंगली आहे. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.