भारती पवार म्हणतात, तुमच्या कष्टामुळेच मी मंत्री झाले! 

मी आज इथपर्यंत पोहोचले, तुमची धावपळ, तुमची मेहनत, तुमचे आशीर्वाद आणि तुमचे माझे प्रति असलेले प्रेम यामुळेच मला हे मंत्रिपद मिळाले, मी सदैव आपल्या सेवेशी असेल, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा भारती पवार यांनी केले.
Bharti janashirwad
Bharti janashirwad
Published on: 
Updated on: 

नाशिक : मी आज इथपर्यंत पोहोचले, तुमची धावपळ, तुमची मेहनत, तुमचे आशीर्वाद ( I have reach here because of your efforts & Blessings)  आणि तुमचे माझे प्रति असलेले प्रेम यामुळेच मला हे मंत्रिपद मिळाले, (i am minister because of your love & Affection) मी सदैव आपल्या सेवेशी असेल, ( I will always serve for constituency) असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी केले. 

राज्यमंत्री डॅा पवार यांची जन आर्शीवाद यात्रा काल पालघर येथून सुरु झाली. आज तीचे नाशिकला आगमन झाले. यावेळी चादंवड येथे त्यांचा स्वागत करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. 

राज्यमंत्री पवार म्हणाल्या, आज भारताने संपूर्ण जगात सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली आहे. स्वतःच्या देशात लस निर्माण करून आज जगभरात अनेक गरजू राष्ट्रांना भारत लस पुरवत आहे. कोरोनाची लाट अजून संपली नाही. काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण आपली काळजी घ्यावी. 

त्या म्हणाल्या, केंद्र सरकारच्या माध्यमातून आरोग्य विषयक गोष्टींचा महाराष्ट्र राज्याला पुरेसा पुरवठा केला जात आहे. तुमच्या सर्वांवर आता मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. मतदार संघाच्या विकासासाठी मी सदैव तत्पर असेन. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी देखील मी कटिबद्ध आहे. देशाच्या विकासासोबत आपल्या मतदारसंघात विकासगंगा आणणार आहे. 

यावेळी जन आशीर्वाद यात्रचे महाराष्ट्र प्रभारी माजी आमदार संज केळकर, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी आघाडीचे अध्यक्ष आमदार डॉ. अशोक ऊईके, जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर, आमदार डॉ.राहुल आहेर, आमदार देवयानी फरांदे यांसह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
....

हेही वाचा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.