आधी जाधव, नंतर हेमंत गोडसेंनी `राष्ट्रवादी`ला हिणवले?

शहरातील वाढीव उड्डाणपुलाचे उदघाटन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. या वेळी त्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ अन् महाविकास आघाडीतील नेत्यांना विचारले नाही. आधी परभणीचे संजय जाधव त्यानंतर हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साइड ट्रॅक केले.
HG_CB F
HG_CB F
Published on: 
Updated on: 

नाशिक : शहरातील वाढीव उड्डाणपुलाचे उदघाटन  खासदार हेमंत गोडसे यांनी केले. (Shivsena Mp Hemant Godse inaugurated Flyover bridge) या वेळी त्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ अन् महाविकास आघाडीतील नेत्यांना विचारले नाही. (In This programme he disregard NCP & Guardian minister Chhagan Bhujbal) आधी परभणीचे संजय जाधव त्यानंतर हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साइड ट्रॅक केले. त्यामुळे  शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली ही ठिणगी (Is This a first political spark in these political colligues) राजकीय वणवा पेटवेल काय? याची चर्चा सुरू झाली आहे.

खासदार हेमंत गोडसे यांनी ज्या उड्डाणपुलाचे उदघाटन  केले, तो पूल सुरवातीपासूनच वादविवादाचा विषय होता. त्याची पहिली ठिणगी भूमिपूजनाच्या कार्यक्रमालाच पडली होती. त्या वेळी हा पूल म्हणजे भारतीय जनता पक्षाचे श्रेय आहे, असे फलक झळकले होते. भाजपच्या शहरातील आमदारांनी त्यात शिवसेनेच्या खासदारांनी थेट शिंगावर घेतले होते. विशेष म्हणजे तेव्हा हे दोन्ही पक्ष एकत्र युतीमध्ये होते. तरीही हा वाद रंगला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याचे भूमिपूजन केले होते. 

रविवारी खासदार गोडसे यांनी उड्डाणपुलाच्या उदघाटनासाठी  जो मुहूर्त निवडला, त्यालादेखील राजकीय झालर आहे. नेमके याच दिवशी भाजपची मंडळी महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी दिल्लीला गेली होती. महाविकास आघाडीचा घटक पक्ष व पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते व छगन भुजबळ यांना त्यांनी निमंत्रित करणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करीत त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांची गर्दी जमवून कार्यक्रम अक्षरशः उरकला. त्याचे राजकीय पडसाद उमटले नसते, तर नवल होते. राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांनी त्यावर शंका-कुशंका पत्रकारांपर्यंत पोचविल्याच. या पुलाची वाहतूक केली. मात्र तात्रिक अहवाल अद्याप मिळालेला नाही. यांपासून तर पालकमंत्र्यांना टाळणे योग्य आहे का?. असे विविध प्रश्न होते. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील यावर आज मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते फीत कापता आली असती, असे सूचक वक्तव्य केले.   

असाच प्रकार काल परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या बाबतीत घडला. त्यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसला थेट पायाखाली घेऊ, असा इशाराच दिला. राष्ट्रवादीचे मंत्री आमची कामे अडवतात. लहानशी मागणी केली तरी त्यांचे पित्त खवळते. त्यामुळे एकत्र निवडणुका होणारच नाहीत. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढविणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली. माकडीनीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःला वाचविण्यासाठी डोक्यावर घेतलेल्या पिलाला पायाखाली घेतो. तसे आम्ही राष्ट्रवादीला पायाखाली घेऊ, असा सज्जड दम त्यांनी दिला. 

ही स्थिती सगळीकडेच आहे. नाशिक शहरात आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचा विचार केला, तर हे दोन्ही पक्ष महापालिका व जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी प्रबळ आहेत. सध्याचे संख्याबळदेखील बोलके आहे. विशेषतः महापालिकेत शिवसेनेने जोरकस तयारी सुरू केली आहे. त्यात महाविकास आघाडी झालीच तर 122 पैकी शहरातील किमान 80 जागा शिवसेनेला व उर्वरित 42 जागा इतर सर्व पक्षांना असे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी जाहीर वक्तव्य केले होते. त्यामुळे निवडणुकीतील संभाव्य वाद आणि राजकीय फड निवडणुकीआधीच रंगतो की काय? अशी चिन्हे आहेत. 
... 

हेही वाचा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.