राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद मोठा होत गेला ; ठाकरेंचा घणाघात

अलीकडे जातीचा मुद्दा हा त्या त्या समाजाच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा बनला आहे.
4raj_20thackray_20ff_1.jpg
4raj_20thackray_20ff_1.jpg
Published on: 
Updated on: 

मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मुद्दा गाजत आहे. जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसवर हल्लाबोल केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत राज ठाकरे Raj Thackeray यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसवर NCP आरोप केला. 

राज ठाकरे म्हणाले, ''देशाला विचार देणारा महाराष्ट्र आता यूपी- बिहारच्या पातळीवर घसरत चालला आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी समाजात जाती- जातीचे विष पेरले जात आहे. अलीकडे जातीचा मुद्दा हा त्या त्या समाजाच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा बनला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला''
मोदी, ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवशाहीर पुरंदरेंचा नागरी सत्कार 
''आपल्या राजकीय स्वार्थासाठी असे वातावरण तयार केले जाते. शिवाजी महाराजांचा आरोप करणारा जेम्स लेन कोण आहे? ज्याने ते पुस्तक लिहिलं. आता तो कुठे आहे. कोणी ओळखतं का त्याला हे सारे ठरवून केलेले होते. एखाद्या विशिष्ट जातीच्या व्यक्तींनी शिवाजी महाराज यांच्याबाबत जेम्स लेनला चुकीची माहिती दिल्याचा प्रचार केला गेला. राजकीय स्वार्थासाठी काहींनी असे वातावरण निर्माण केले,'' असा आरोप राज ठाकरे यांनी या मुलाखतीत केला आहे.

हेही वाचा : आधी जाधव, नंतर हेमंत गोडसेंनी `राष्ट्रवादी`ला हिणवले!
नाशिक : शहरातील वाढीव उड्डाणपुलाचे उदघाटन  खासदार हेमंत गोडसे यांनी केले. या वेळी त्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ अन् महाविकास आघाडीतील नेत्यांना विचारले नाही. आधी परभणीचे संजय जाधव त्यानंतर हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साइड ट्रॅक केले. त्यामुळे  शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली ही ठिणगीराजकीय वणवा पेटवेल काय? याची चर्चा सुरू झाली आहे.
 Edited by : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.