नाशिकला वाढतोय हनी ट्रॅपचा धोका? 

सोशल मीडियाद्वारे महिलांच्या बोगस प्रोफाईलद्वारे फसवणुकीच्या रॅकेटचा ग्रामीण पोलिसांना संशय आहे. त्यामुळे अनोळखी महिलांशी चॅटिंग व व्हिडिओ कॉल टाळा किंवा संपर्क टाळा. तुमची कदाचित फसवणूक होऊ शकते. ग्रामीण भागात फसलेल्यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.
Sacin Patil
Sacin Patil
Published on: 
Updated on: 

नाशिक : सोशल मीडियाद्वारे महिलांच्या बोगस प्रोफाईलद्वारे (Bogus profiles of Womens on Social Media) फसवणुकीच्या रॅकेटचा ग्रामीण पोलिसांना संशय आहे. त्यामुळे अनोळखी महिलांशी चॅटिंग व व्हिडिओ कॉल टाळा (Avoid chatting) किंवा संपर्क टाळा. तुमची कदाचित फसवणूक होऊ शकते. ग्रामीण भागात फसलेल्यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील (DSP Sachin Patil) यांनी केले.

नाशिकला महिलांचे प्रोफईल बनवून हनी ट्रॅपमध्ये लोकांना अडकविण्याचे काही प्रकार उघडकीस आले आहेत. लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी पुढाकार घेत सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे. नाशिक पोलिसांनी याबाबत जनजागृतीसाठी एक मोहीम हाती घेतली असून, त्याद्वारे लोकांनी काळजी व फसवणूक झाली असेल, तर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तीची ओळख व नाव गोपनीय ठेवले जाईल. त्यामुळे न घाबरता तक्रार केल्यास यामागे असलेले मोठे रॅकेट उघड होऊन इतर लोकांची फसवणूक टाळता येऊ शकते.

सोशल मीडियाचे प्रत्येक ॲप अभ्यासून वापरणे व सतर्क राहणे गरजेचे आहे. व्हाॅट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, डेटिंग ॲप आदींच्या माध्यमातून महिलांच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून पुरुषांशी मैत्री झाल्यावर अश्लील चाळे करण्यास भाग पाडून त्याचा व्हिडिओ तयार करण्यात येतो व शेवटी अकाउंट हॅक करून धमकीद्वारे पैशाची मागणी केली जाते. शारीरिक लोभाचे आमिष दाखवून अनोळखी महिलेशी बोलताना कमालीची सतर्कता ठेवा. नाशिक पोलिसांनी यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पीडित व्यक्तींनी समोर यावे.

...
बहुतांश वेळा महिलेच्या नावाने पुरुष अकाउंट वापरतात व फसवणुकीच्या जाळ्यात अडकवतात. त्यामुळे असा प्रकार घडला असेल, तर निःसंकोचपणे जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी.
-सचिन पाटील, पोलिस अधीक्षक
...
हेही वाचा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.