संजय राठोडांना कुणाच्या सांगण्यावरुन बेड्या ठोकल्या नाहीत!

ठाकरे सरकार आणखी महिलांवर अत्याचार होण्याची वाट पहातेय ?
1Chitra_20Wagh_20_20Uddhav_20Thackeray.png
1Chitra_20Wagh_20_20Uddhav_20Thackeray.png
Published on: 
Updated on: 

मुंबई : शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर आणखी एका महिलेने गंभीर आरोप केला आहे. यावरुन भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ठाकरे  सरकारवर Uddhav Thackeray निशाणा साधला आहे. ''संजय राठोड यांच्या विरोधात पुरावे असताना कुणाच्या सांगण्यावरुन त्यांना बेड्या ठोकल्या नाहीत,'' असा प्रश्न चित्रा वाघ  Chitra Wagh यांनी उपस्थित केला आहे. 

चित्रा वाघ म्हणतात, ''संजय राठोड यांच्यामुळे एका भगिनीने जीव दिला. त्याला ढळढळीत पुरावे असतांनाही अजूनही कुणाच्या सांगण्यावरून त्यांना बेड्या ठोकल्या गेल्या नाहीत. ते अजूनही मोकाट कसे फिरत आहेत? का ठाकरे सरकार आणखी महिलांवर अत्याचार होण्याची वाट पहातेय ?''

''तालीबानी प्रवृत्ती या महाराष्ट्रात महिलांनी कधी अनुभवली नव्हती, जिची ठाकरे सरकारच्या काळात अनुभूती मिळतेय. मला मुख्यमंत्र्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की, एखाद्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी आत्महत्याच करावी लागेल का? तिला जीवचं द्यावा लागणार आहे का ? आज मी महाराष्ट्रातील माझ्या सगळ्या भगिनींना आवाहन करते की रक्षाबंधनच्या दिवशी एक ‘रक्षा-बंधना’ चा धागा मुख्यमंत्र्यांना जरूर पाठवा. जेणेकरून मुख्यमंत्री म्हणून त्यांना महाराष्ट्रातील त्यांच्या भगिनींची व त्यांच्या रक्षणाची जाण होईल,'' असे चित्रा वाघ म्हणाल्या. याबाबत वाघ यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. 

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद मोठा होत गेला ; ठाकरेंचा घणाघात
पुण्यातील एका तरुणीच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. त्यामुळे राठोड यांनी तिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्रिमंडळातून बाहेर राहण्याची भूमिका घेत राजीनामा दिला होता. मात्र आता पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्याने संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

या तरुणीने सात फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते.  संजय राठोड यांनी 28 फेब्रुवारीला  राजीनामा दिला. 
 Edited by : Mangesh Mahale 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.