Manoj Jarange Patil News: 'कुणालाही एक रुपयाही द्यायचा नाही', जरांगे काय म्हणाले?

Manoj Jarange Patil on Microfinance Loan Recovery: दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मनोज जरांगे पाटील यांनी धीर दिला. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन करत मायक्रोफायनान्स कंपन्यांना इशारा दिला.

Microfinance Loan Recovery: दुष्काळ आणि कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत भावनिक आणि तितकेच आक्रमक आवाहन केले आहे. दुष्काळाचं हेही संकट निघून जाईल, मी तुमच्या पाया पडतो पण टोकाचं पाऊल उचलू नका; मागे लेकराबाळांचे लई हाल होतात. आम्ही संपूर्ण ताकदीने शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.' यासोबतच सक्तीने कर्जवसुली करणाऱ्या खाजगी मायक्रोफायनान्स कंपन्यांना त्यांनी सज्जड दम दिला. 'महाराष्ट्रात कोणत्याही शेतकऱ्याने फायनान्स कंपन्यांना एक रुपयाही द्यायचा नाही, कोणीच पैसे भरायचे नाहीत. वसुलीसाठी कोण गावात येतंय तेच बघतो,' असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.