Dhangar Reservation : यशवंत सेना धनगर नेत्यांवर संतप्त! एसटी आरक्षण अंमलबजावणीवर शब्दही काढला नाही

Yashwant Sena : ओबीसी नेत्यांनीही धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले
Balasaheb Dodtale, Yashwant Sena
Balasaheb Dodtale, Yashwant SenaSarkarnama

Ahmednagar Political News : मराठा आरक्षणाला ओबीसींचा विरोध, धनगर आरक्षणाच्या मागणीकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. यातच अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार सभा पार पडली. या वेळी ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगेंच्या मागणीला जोरदार विरोध केला. मात्र, या व्यासपीठावर उपस्थित धनगर नेत्यांनी समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत चकार शब्दही काढला नाही. परिणामी यशवंत सेनेसह समाजाने संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत दिलेली ५० दिवसांची मुदत संपली तरी सरकारने ठोस निर्णय घेतला नाही. यामुळे यशवंत सेनेच्या नगरमधील चौंडी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तसेच आरक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बारामती येथेही धनगर समाजाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. धनगरांच्या मागणीकडे सरकार डोळेझाक करत असतानाही मिळालेल्या ओबीसींच्या मोठ्या व्यासपीठावर उपस्थित असूनही आपल्या नेत्यांनी एकही शब्द काढला नाही. याचा यशवंत सेनेच्या वतीने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Balasaheb Dodtale, Yashwant Sena
Uddhav Thackeray On BJP : उद्धव ठाकरेंनी दाबली होती भाजप, संघाची दुखरी नस...

अंबड येथील ओबीसी एल्गार सभेत छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह धनगर समाजाचे गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे आदी नेते होते. या मेळाव्यास ७० टक्के युवक हे धनगर समाजाचे होते, असा दावा यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष प्रा. अण्णासाहेब रुपनवर, नितीन धायगुडे, किरण धालपे, माणिकराव दांगडे पाटील यांनी केला. येथे धनगर नेत्यांनी ओबीसी आरक्षणानिमित्त जोरदार भाषणे ठोकत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी आक्रमक भूमिका व्यक्त केली. मात्र, आपल्या समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले, असा यशवंत सेनेचे अध्यक्ष दोडतले यांनी केला आहे.

Balasaheb Dodtale, Yashwant Sena
Vivek Kolhe : नीलेश लंकेंच 2024ला विजयाचा गुलाल उधळणार, विवेक कोल्हेंचं भाकीत; पण लोकसभा की विधानसभा?

बाळासाहेब दोडतले हे स्वतः चौंडी येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. ते म्हणाले, 'छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार या ओबीसी नेत्यांनीही धनगर समाजाच्या मागणीवर भाष्य केले नाही, याबद्दल वाईट वाटते. त्याहीपेक्षा जास्त वाईट आमच्याच समाजाचे गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे यांनीही धनगर समाजाच्या मागणीवर एकही शब्दही काढला नाही. हे समाजासाठी खूप संतापजनक आहे.'

मराठा समाज, ओबीसी समाज आपापल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून तीव्रपणे लढत असताना धनगर समाजाच्या नेत्यांनीही आपल्या समाजाची मागणी वेगवेगळ्या व्यासपीठांवर जोरदारपणे मांडली पाहिजे. त्याचबरोबर आता धनगर समाज रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने सरकारकडे आपली मागणी रेटणार आहे. यापुढे सरकार चौंडीमध्ये स्वतः अध्यादेश घेऊन येत नाही, तोपर्यंत यशवंत सेनेचे उपोषणाला बसलेले कार्यकर्ते उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार यशवंत सेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Balasaheb Dodtale, Yashwant Sena
Udayanraje Bhosale : मनोज जरांगेंना उदयनराजे भोसलेंचे बळ; साताऱ्यात नेमकं काय घडलं ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com