28 September in History : युती नक्की कुणी तोडली..दहा वर्षांनीही प्रश्न कायमच?

28 September in History : या चर्चेला सुरुवात झाली त्याचे वार्तांकन 29 सप्टेंबर, 2014 च्या दैनिक सकाळमध्ये....
28 September in History Dinvishesh
28 September in History Dinvishesh Sarkarnama
Published on
Updated on

स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. प्रमोद महाजन यांनी सुमारे 25 वर्षे एकसंध ठेवलेली शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती 25 सप्टेंबर, 2014 या दिवशी संपुष्टात आली. त्याच दिवशी महाराष्ट्रात सत्तेवर असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षही वेगळे झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतला.

भाजप शिवसेनेमध्येही पूर्वी धुसफूस होत होती. पण स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. महाजन काहीतरी खटपट करुन बाळासाहेबांना मनवायचे. पण विधानसभेच्या निवडणुकांचा हालचाली 2014 साली टोकाला पोहोचल्या तेव्हा यापैकी कुठलेच नेते हयात नव्हते. आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राज्याच्या भाजपची सूत्रं आली होती.

त्यावेळी 27 सप्टेंबरला मुंबईत झालेल्या एका जाहीर सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप- आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे वाभाडे काढले होते. तर दुसरीकडे तेव्हाचे भाजप प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. युती तोडण्यातले 'व्हिलन'जनता दाखवेल असे सांगत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.

त्यानंतर राज्यात निवडणुका झाल्या. त्यावेळी देशभरात मोदी लाट होती. त्या निवडणुकीत भाजपने तब्बल 122 जागा जिंकल्या. शिवसेनेने 63 जागा जिंकल्या. राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन झाले. शिवसेनाही सत्तेत सहभागी झाली. पण त्यावेळी दुभंगलेली मने पुन्हा सांधली गेलीच नाहीत

28 September in History Dinvishesh
27 September in History : इथपासूनच झाली महाराष्ट्राच्या अस्थिर राजकारणाची सुरुवात

त्याची परिणती दिसून आली 2019 च्या विधानसभा निवडणुकीत. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीची संगत पकडली आणि ते मुख्यमंत्री झाले. त्या निवडणुकीपूर्वी अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद यावरून भाजप-शिवसेनेत खल, मतमतांतरे सुरु होती. पण अखेर शिवसेनेने भाजपची साथ पूर्ण सोडली ती आजपर्यंत.

पण तेव्हापासूनच एक चर्चा मात्र सतत सुरू असते. युती नक्की कुणी तोडली. आजही उद्धव ठाकरेंचा गट आणि भाजप एकमेकांकडे बोटे दाखवतोच आहे. पण युती नक्की कुणी तोडली हे मात्र सर्वसामान्य मतदाराला समजू शकलेले नाही...या चर्चेला सुरुवात झाली त्याचे वार्तांकन 29 सप्टेंबर, 2014 च्या दैनिक सकाळमध्ये....

28 September in History Dinvishesh
26 September in History : त्यावेळी स्वबळावर, यावेळचं काय?

दिनविशेष - 28 सप्टेंबर

  • 1746 - ब्रिटिश प्राच्यविद्या संशोधक, कायदेपंडित सर विल्यम जोन्स यांचा जन्म. 1784 मध्ये त्यांनी "एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल' या संस्थेची स्थापना केली. भारतात न्यायाधीश म्हणून येण्यापूर्वी त्यांनी अनेक भाषांचा अभ्यास केला. त्यांनी

  • 1898 - स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार शंकर रामचंद्र ऊर्फ मामाराव दाते यांचा जन्म. हिंदू महासभेचे कार्यकर्ते, "सकाळ'चे संपादक, मोनोटाइप यंत्रावर देवनागरी लिपी बसविणारे तंत्रज्ञ म्हणून त्यांनी लौकिक मिळविला. "सकाळ'च्या उभारणीत त्यांनी डॉ. नानासाहेब परुळेकर यांना सहकार्य केले. भागानगर सत्याग्रह, हिंदुस्थान इतिहास, हिंदुधर्म स्वरूप, भारतीय समाजवाद, मुद्रण स्वरूप ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

  • 1929 - गेल्या सहा दशकांहून अधिक काळ असंख्य माणसांच्या अंतःकरणात आपल्या सुमधुर स्वरांनी नादमुग्ध करणाऱ्या विख्यात गायिका स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्म.

28 September in History Dinvishesh
Devendra Fadnavis : 'लाडक्या बहीणीं'साठी भाजपचं नवीन गाणं; 'बहिणींचा भाऊ, देवा भाऊ'
  • 1970 - इजिप्तचे अध्यक्ष, अरब लीगचे सूत्रधार व अलिप्ततावादी चळवळीचे पुरस्कर्ते गमाल अब्देल नासर यांचे निधन.

  • 1992 - पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ काळ झगडलेले मेजर (निवृत्त) ग. स. ठोसर यांचे निधन.

  • 1997 - भूतपूर्व औंध संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत श्रीपतराव भगवंतराव पंतप्रतिनिधी यांचे निधन.

  • 2000 - भारतीय नौदलाची प्रहारक्षमता वाढविणारी चौथी क्षेपणास्त्रवाहू नौका "प्रबल' चे समारंभपूर्वक जलावतरण. "प्रबल' ही "नाशक' वर्गातील नौकांपैकी एक आहे.

  • 2003 - भारताच्या अतिप्रगत "इन्सॅट 3 ई' या दळणवळण उपग्रहाचे फ्रेंच गियानातील कोरू तळावरून यशस्वी प्रक्षेपण. युरोपीय अवकाश संशोधन संस्थेच्या "एरिअन 5' या उपग्रहवाहकातून हे प्रक्षेपण झाले. "इन्सॅट'बरोबरच या वाहकात "युटेलसॅट'चे "ई-बर्ड' आणि युरोपीय अवकाश संस्थेचा "स्मार्ट 1' हे अन्य दोन उपग्रहही होते. "इन्सॅट 3 ई' उपग्रहामुळे दूरसंचार आणि दूरचित्रवाणी सेवा अधिक कार्यक्षम होणार आहे.

  • २०१५ ः खगोलशास्त्राला समर्पित केलेल्या भारताच्या पहिल्या ‘स्ट्रोसॅट’ या अवकाश वेधशाळेचे यशस्वी प्रक्षेपण.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com