इतिहासात आजच्या दिवशी म्हणजेच ४आॅक्टोबर रोजी दोन महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. त्यातली एक घटना म्हणजे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया Norh and South Korea यांच्यात झालेला ऐतिहासिक शांतता करार. ४ आॅक्टोबर २००७ रोजी सोल येथे उत्तर कोरियाचे नेते किम जोंग इल आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष रोह मू-ह्यून यांनी या करारावर त्या दिवशी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. दोन्ही देशातली ही दुसरी परिषद होती..
कोरियन युद्ध War संपल्यानंतर ५४ वर्षांपूर्वी एक करार करण्यात आला होता. त्याची जागा घेणारा हा नवा करार आजच्या दिवशी करण्यात आला. 4 October in History News about Russia and Korea
रशियाची अवकाश स्वारी
दुसरी घटना खूप जुनी पण महत्त्वाची. रशियाने Russia ४ आॅक्टोब १९५७ रोजी अवकाशात 'स्पुटनिक-१' हा पहिला मानवनिर्मित उपग्रह सोडला. स्पुटनिक याचा अर्थ 'पृथ्वीचा सहप्रवासी'. रशियाने सोडलेल्या या उपग्रहाचा आकार बास्केटबाॅलच्या चेंडूएवढा होता. त्याचे वजन ८३ किलोग्रॅम होते. कझाकिस्तानातील बैकनूर अवकाशतळावरून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते.
हा उपग्रह अवकाशात ९६ दिवस होता. त्या काळात त्याने पृथ्वीला १४४० प्रदक्षिणा घातल्या होत्या.
दिनविशेष - 4 ऑक्टोबर
1957 - सोव्हिएत रशियाने स्फुटनिक-1 हा उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.
1959 - रशियाच्या लूनिक -3 या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागाची छायाचित्रे घेतली.
1995 - हत्या झालेले पंजाबचे मुख्यमंत्री Chief Minister बेअंतसिंग आणि नागालॅंड गांधी आश्रमाचे संस्थापक सचिव नटवर ठक्कर यांची इंदिरा गांधी पुरस्कारासाठी निवड.
1997 - तिहार तुरुंगामध्ये असलेली स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल ज्येष्ठ महिला पोलिस अधिकारी किरण बेदी यांना चौदा हजार डॉलरचा "जोसेफ बॉईस' पुरस्कार देण्यात आला.
2001 - देशातील पहिल्या मानसोपचार समाजसेविका मालतीबाई गोविंद रानडे यांचे निधन.
2001 - जगात सर्वांत मोठी असलेली खोडदमधील रेडिओ दुर्बीण ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा मूलभूत संशोधन केंद्राचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या हस्ते सर्व शास्त्रज्ञांसाठी खुली.
2002 - फिल्म डिव्हिजनच्या वृत्तपटांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाद्वारे लोकप्रिय करणारे ज्येष्ठ निवेदक भाई भगत यांचे निधन.
२०१४ ः भारतीय वंशाचे अमेरिकेतील प्राध्यापक थॉमस कैलाथ यांची अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात विशेष कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय विज्ञान पदकासाठी निवड केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.