Congress
Congress Sarkarnama

Karnataka Assembly Election : कर्नाटकातील विजयासाठी काँग्रेसला महाराष्ट्रातून मोठी 'रसद'!

कर्नाटकातील निवडणुकीत प्रचारासाठी महाराष्ट्रातून जाणारी ही प्रचारकांची टीम मराठी बहुल भागासह कर्नाटकच्या इतर मतदारसंघातही जोमाने प्रचार करतील.

मुंबई : कर्नाटक (Karnataka) विधानसभेच्या २२४ जागांसाठी काँग्रेसकडून (Congress) दोन टप्प्यात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. काँग्रेस कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी स्टार प्रचारकाबरोबरच इतर ५१ सदस्यांची टीम जाणार आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) हे सर्व नेते त्यांना वाटून दिलेल्या मतदारसंघात जाऊन काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. (51 Congress leaders will go from Maharashtra to campaign for the Karnataka Assembly)

कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनेही स्टार प्रचारकांबरोबरच इतर प्रचारकांची एक मोठी फौज उभी केली आहे. कर्नाटकातील निवडणुकीत प्रचारासाठी महाराष्ट्रातून जाणारी ही प्रचारकांची टीम मराठी बहुल भागासह कर्नाटकच्या इतर मतदारसंघातही जोमाने प्रचार करतील.

Congress
Karnataka Election : भाजपचा आणखी सात विद्यमान आमदारांना डच्चू; २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रचारकांच्या यादीत प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री रमेश बागवे, सिद्धराम म्हेत्रे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, ओबीसी विभागाचे भानुदास माळी, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, एनएसयुआमचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख यांच्यासह सरचिटणीस, सचिव, प्रवक्ते व पदाधिकारी यांची ५१ सदस्यांची टीम बनवली आहे.

Congress
BJP NEWS : भाजपचा आमदार राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार?

महाराष्ट्रातील हे नेते जाणार कर्नाटकात प्रचाराला

आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार रामहरी रुपनवर, मोहन जोशी, एम.एम. शेख, माजी मंत्री रमेश बागवे, विशाल पाटील, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, आमदार वजाहत मिर्झा, धीरज देशमुख, राजेश राठोड, विक्रम सावंत,राजू आवाळे, ऋतुराज पाटील, हुस्नबानो खलिफे, दीप्ती चवधरी, अभय छाजेड, संजय लाखे पाटील, सचिन सावंत, रवींद्र दळवी, राणी अग्रवाल, वीरेंद्र किराड, अशोक पाटील निलंगेकर, संजय बालगुडे, अमर खानापुरे, नंदकुमार कुंभार, ब्रीजकिशोर दत्त, मोईज शेख, सत्संग मुंडे, जितेंद्र देहाडे, मुजाहीद खान, जावेद अन्सारी, रणजित देशमुख, शशांक बावच्छेकर, दत्तू भालेराव, अभय साळुंखे, निखिल खविंसवार, पृथ्वीराज पाटील, धीरज पाटील, श्रीशैल उटगे, किरण जाधव, दयानंद चोरघे, विक्रांत चव्हाण, कुणाल राऊत, विलास अवताडे, अमीर शेख, सिद्धार्थ हट्टीबिंरे, नामदेव उसेंडी, भानुदास माळी, तौफिक मुलाणी, जेसाभाई मोटवानी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com