Ajit Pawar Latest News : अजितदादांच्या महत्वाकांक्षेला स्वपक्षीयांचेच आव्हान?

NCP News : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर हक्क सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी एकच खळबळ उडवून दिली.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर हक्क सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी एकच खळबळ उडवून दिली. त्याचे पडसाद आज उमटू लागले आहेत. प्रदेशाध्यक्षपद समाजातील इतर घटकांना मिळावे, अशी भूमिका मांडत स्वत:सह इतर काही नेत्यांची नावे सांगत पक्षात नवा गोंधळ ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उडवून दिला.

अजित पवार यांनी भूमिका मांडल्यानंतर पक्षात खांदेपालट होईल. जयंत पाटील यांच्याकडे असलेले प्रदेशाध्यक्षपद अजित पवार यांच्याकडे तर अजित पवार यांच्याकडील विरोधी पक्षनेतेपद जयंत पाटील यांच्याकडे जाईल, असे वाटत असताना भुजबळ यांच्या वक्तव्याने पक्षात नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar News
Chhagan Bhujbal News : भुजबळांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीचीच कोंडी; ओबीसींचा मुद्दा पुढे करत म्हणाले...

भुजबळ यांनी आज नवी चर्चा सुरू केली. त्याआधी पवार यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले. मात्र, राज्यातील जातीय समीकरणांचा विचार केल्यास पवार यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष होणे सोपे नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आहेत, सुप्रिया सुळे नुकत्याच कार्याध्यक्ष झाल्या आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद अजित पवार (Ajit Pawar) यांना दिले तर एकाच घरात पदांची अशाप्रकारे वाटणी शरद पवार यांना मान्य होईल का हा खरा प्रश्‍न आहे.

येत्या काळात राज्यात लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. पुढचा दोन वर्षांचा संपूर्ण काळ निवडणुकांचा आहे. या काळात अजित पवार यांच्यासारखा धडाडीचा प्रदेशाध्यक्ष पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणारा आहे. मात्र, वरील गोष्टींचा विचार करता अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपद मिळणे कठीण वाटते.

अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा विचार बोलून दाखवताच भाकरी फिरवण्याची चर्चा रात्रीतून सुरू झाली. पक्षात माझ्यासह सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांच्यासारखे सक्षम लोक असल्याची भूमिका भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मांडली आहे. अजित पवार इच्छुक असताना भुजबळ यांनी स्वत: इच्छुक असल्याचे सांगत इतरांचीही नावे घेतली आहेत. यातून पक्ष नेतृत्वापुढे पेच निर्माण होऊ शकतो. पवार यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर लगेचच भुजबळ यांनी भूमिका स्पष्ट करणे याचा राजकीय अर्थ प्रत्येकजण स्वत:च्या सोयीने काढू लागला आहे. पक्षातील सामान्य कार्यकर्ता आणि पक्षाला मानणारा मतदारही याचीच चर्चा करू लागला आहे.

Ajit Pawar News
Ajit Pawar News : राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार! अजित पवार प्रदेशाध्यक्ष तर जयंत पाटलांकडे जाणार 'हे' पद?

अजितदादांना आताच का हवेय प्रदेशाध्यक्षपद?

येत्या दोन वर्षात राज्यात लोकसभा, विधानसभा, महापालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या काळात प्रक्षाचे अध्यक्षपद आपल्याकडे असावे, असे वाटण्यात अयोग्य काहीच नाही. कोणत्याही महत्वाकांक्षी नेत्यासाठी ते आवश्‍यकच आहे. पवार यांची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही.

येत्या निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी प्रचंड कष्ट घेण्याची पवार यांची तयारी आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून निवडणूक लढविली तरी या तीन्ही पक्षात सर्वाधिक आमदार निवडून आणण्याची तयारी अजित पवार करीत आहेत. कारण निवडणुकीनंतर आघाडीत ज्याचे. अधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री असे सूत्र राहणार आहे. त्यामुळे आमदारांचा मोठा आकडा गाठण्याच्या ध्येयापोटी पवार यांना स्वत:कडे प्रदेशाध्यपद हवे, असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com