Chhagan Bhujbal News : भुजबळांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीचीच कोंडी; ओबीसींचा मुद्दा पुढे करत म्हणाले...

Ajit Pawar News : भुजबळांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीला ओबीसींबद्दल विचार करावा लागणार...
Sharad Pawar, Chhagan Bhujbal News
Sharad Pawar, Chhagan Bhujbal NewsSarkarnama
Published on
Updated on

Ncp News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद नको, पक्ष संघटनेत जबाबदारी द्या, त्या पदाला न्याय देईल, असे म्हणत मोठे विधान केले होते. अजित पवार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचीच कोंडी झाली.

अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, ''राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदावर एका समाजाची व्यक्ती असेल, तर प्रदेशाध्यक्षपदावर दुसऱ्या समाजाची व्यक्ती असावी. सद्यःस्थितीत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे असल्याने प्रदेशाध्यक्ष पदी ओबीसी समाजाच्या नेत्याला संधी द्यावी.

Sharad Pawar, Chhagan Bhujbal News
Ajit Pawar News : राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार! अजित पवार प्रदेशाध्यक्ष तर जयंत पाटलांकडे जाणार 'हे' पद?

ओबीसींबद्दल फक्त बोलून चालणार नाही. त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली पाहिजे. पक्षात सुनील तटकरे, जिंतेद्र आव्हाड, धनंजय मुंडे आहेत. मला जरी ही जबाबदारी दिली तरी काम करेन." ही आमची फक्त सूचना आहे. पक्षातील कुणाला कुठले पद द्यायचे याचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच घेतील. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विधानामुळे राष्ट्रवादीची कोंडी झाल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आणि जयंत पाटील यांच्याकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद असा बदल राष्ट्रवादीमध्ये केला जाऊ शकतो, अशी चर्चा होती. मात्र, छगन भुजबळ यांनी ओबीसी (OBC) नेत्यांकडे प्रदेशाध्यक्ष किंवा विरोधी पक्षनेते पद असावे, अशी मागणी केली. भुजबळांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचीच कोंडी झाल्याची चर्चा आहे.

Sharad Pawar, Chhagan Bhujbal News
Sandipan Bhumre News : माजला का ? तुझा बाप बोलतोय ; मुलावर आरोप होताच भुमरे भडकले...

या वेळी अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, नव्या चेहऱ्यांना आपण संधी दिली पाहिजे. इतकी वर्ष काम केले. मला सगळ्यांना सांगायचे आहे, मला विरोधी पक्ष नेते पदावर इच्छा नव्हती. मात्र, सगळे आमदार बोलले तुम्ही व्हा म्हणून जबाबदारी घेतली. कोणी म्हणते मी कडक वागत नाही. मला विरोधी पक्ष नेते पदावरून मुक्त करा, पक्षातील जबाबदारी द्या. संघटनेत कोणतेही पद द्या, त्या पदाला मी न्याय असा शब्द देतो, असे पवार यांनी स्पष्ट केले.

तर मेळाव्यात बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले होते, प्रदेशाध्यक्ष पदावर मला पाच वर्ष एक महिना झाला आहे. अजितदादांनी तर माझ्या प्रदेशाध्यक्ष पदाचे महिनेही मोजले आहेत. मी पाच वर्षापासून सांगतोय की बुथ कमिट्यांवर लक्ष द्या, तसे केले तर आपला पक्ष मजबूत होईल, असे जयंत पाटील म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com