खासदार अमोल कोल्हेंवर वळसे पाटलांचे समर्थक नाराज; ती पोस्ट अवघ्या अर्ध्या तासात झाली डिलिट

विद्यमान खासदारांना तीन महिन्यांपासून वेळ भेटत नाही. त्यामुळे माजी खासदारांकडून (अशोक मोहोळ) उद्‌घाटन करून घेतले. जुने ते सोने असते.
Amol Kolhe
Amol KolheSarkarnama

पारगाव (जि. पुणे) : शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) यांच्यावर आंबेगाव तालुक्यातील पक्षाचेच कार्यकर्ते नाराज असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी येथील विविध विकास कामाच्या उद्‌घाटनासाठी वेळ न दिल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचे कट्टर समर्थक आणि खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सोशल मीडियातून उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Activists of Dilip Walse Patil are upset with MP Amol Kolhe)

वळसे पाटील यांचा घरच्या पारगाव-अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीच्या पाठीशी भक्कम उभे राहणारे पोंदेवाडी हे गाव. या गावातील सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या नवीन नळ पाणीपुरवठा योजना, नवीन ग्रामपंचायत इमारतीची भूमिपूजन तसेच माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी म्हणजे शनिवारी (ता. १७ सप्टेंबर) वळसे पाटील, माजी खासदार अशोक मोहोळ व तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.

Amol Kolhe
भाजप प्रवेशाचा दावा होणाऱ्या अभिजित पाटलांची पवारांसमवेत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजेरी

या कार्यक्रमाची पत्रिकाही तयार करण्यात आली होती. निमंत्रण पत्रिकेवर वळसे पाटील, अशोक मोहोळ, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांचे फोटो व नावे टाकण्यात आली होती. मात्र, या कार्यक्रम पत्रिकेत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा फोटो व नावाचा कोठेही उल्लेख करण्यात आला नव्हता, त्यामुळे पोंदेवाडी गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

Amol Kolhe
Grampanchayat Election : आंबेगावात १४ ग्रामपंचायती जिंकून राष्ट्रवादीचे वर्चस्व राखले; मात्र शिंदे गटानेही खाते उघडले

याबाबत याच जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सोशल मीडियाद्वारे जाहीरपणे खासदार कोल्हे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. कार्यक्रम पार पडताच अनिल वाळुंज यांनी फेसबुकवर विद्यमान खासदारांना तीन महिन्यांपासून वेळ भेटत नाही. त्यामुळे माजी खासदारांकडून (अशोक मोहोळ) उद्‌घाटन करून घेतले. जुने ते सोने असते. विद्यमान खासदार शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. खासदारकीला पंचायत समिती गणातून पोंदेवाडी गावाने साडेतीनशे मतांची आघाडी दिली आहे. मात्र, खासदार अजून एकदाही गावात आले नाहीत. त्यांना परत गावात यायला वेळ भेटेल असे वाटत नाही. मात्र, आमच्या गावाचे प्रेम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि वळसे पाटील यांच्यावर आहे आणि ते कायम राहणार आहे, हे ध्यानात ठेवा, अशा प्रकारची पोस्ट टाकली. त्या पोस्टनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. ही पोस्ट टाकल्यानंतर अर्धा तासातच अनिल वाळुज यांनी ही पोस्ट फेसबुकवरून डिलीटही केली.

Anil Valunj facebook post
Anil Valunj facebook postSarkarnama

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठांच्या सूचनेचा मान राखून मी पोस्ट डिलीट केली असली तरी खासदार डॉ. कोल्हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमांना वेळ देत नसल्याने आमच्यात नाराजी आहेच, असे अनिल वाळूंज यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपण निवडून दिलेल्या खासदार अमोल कोल्हे यांच्यावरच किती नाराज आहेत, हे यावरून दिसून येत आहे. या अगोदरही पोंदेवाडी गावामध्ये विविध विकास कामाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात अमोल कोल्हे यांना बोलवूनही ते न आल्याने यावेळी कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव व फोटो टाकला नसल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com