Grampanchayat Election : आंबेगावात १४ ग्रामपंचायती जिंकून राष्ट्रवादीचे वर्चस्व राखले; मात्र शिंदे गटानेही खाते उघडले

भाजप एका ग्रामपंचायतीत विजय झाला आहे.
Grampanchayat Election : आंबेगावात १४ ग्रामपंचायती जिंकून राष्ट्रवादीचे वर्चस्व राखले; मात्र शिंदे गटानेही खाते उघडले

मंचर (जि. पुणे) : आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील अठरा ग्रामपंचायतींपैकी (Gram Panchayat) १४ ग्रामपंचायतींवर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) निर्विवाद वर्चस्व राखले आहे. राष्ट्रवादीने वर्चस्व राखले असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या नेतृत्वाखाली तीन ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे. भाजप एका ग्रामपंचायतीत विजय झाला आहे. (NCP maintained its supremacy by winning 14 Gram Panchayats in Ambegaon)

आंबेगाव तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले. तालुक्यातील घोडेगाव येथे आज (ता. १९ सप्टेंबर) अठरा ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. माजी मंत्री वळसे पाटील यांनी १४ ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तीन ग्रामपंचायतीवर, तर भारतीय जनता पक्षाने एका ग्रामपंचायत वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

Grampanchayat Election : आंबेगावात १४ ग्रामपंचायती जिंकून राष्ट्रवादीचे वर्चस्व राखले; मात्र शिंदे गटानेही खाते उघडले
Grampanchyat Election : महाजनांना जळगावमध्येच धक्का : राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गटाचे वर्चस्व; भाजप-काँग्रेसला भोपळा

शिंदे गटाकडून पांचाळे बुद्रूक, वाळुंज वाडी, वडगाव काशिंबेग या ग्रामपंचयती जिंकल्याचा दावा केला आहे. भाजपने राजेवाडी ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. अन्य १४ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. त्यामध्ये आंबेगाव गावठाण, थोरांदळे, गंगापूर बुद्रूक, पिंपळगाव तर्फे घोडा, राजपूर, माळीण, शिनोली, आसाणे, कोंढवळ, ढाकाळे, पोखरी, जांभोरी, तिरपाड, फदालेवाडी-उगलेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Grampanchayat Election : आंबेगावात १४ ग्रामपंचायती जिंकून राष्ट्रवादीचे वर्चस्व राखले; मात्र शिंदे गटानेही खाते उघडले
भोरमध्ये राष्ट्रवादीचा थोपटेंना धक्का; सरपंचपदासह दोन्ही ग्रामपंचायतींवर फडकवला झेंडा

आंबेगाव तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. त्यानुसार तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीच्या खालोखाल एकनाथ शिंदे गटाने तीन ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शिंदे गटाने आंबेगाव तालुक्यात आढळराव पाटील यांच्या माध्यमातून आपले खाते उघडले आहे.

Grampanchayat Election : आंबेगावात १४ ग्रामपंचायती जिंकून राष्ट्रवादीचे वर्चस्व राखले; मात्र शिंदे गटानेही खाते उघडले
कटकारस्थान करून त्यावेळी मला मुख्यमंत्रिपदावरून काढलं अन्‌ राज्यपाल केलं : सुशीलकुमार शिंदेंचा स्वकीयांवर हल्ला

दरम्यान, वाळुंजवाडीचे सरपंच नवनाथ वाळुज यांनी मी कुठल्याही पक्षाचा नाही, असे जाहीर केले आहे, त्यामुळे शिंदे गटाने केलेले संख्याबळ एकाने घटण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com