तसं मी कुणाचं ऐकत नाही...पण मराठवाडा माझी सासूरवाडी असल्यानं ऐकावं लागतं!

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची प्रेमळ मागणी होताच....अजितदादांनी मास्क काढून भाषण केले!
AJit Pawar
AJit PawarSarkarnama
Published on
Updated on

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मास्क वापरण्याबाबत कमालीचे दक्ष आहेत. मास्क न वापरणाऱ्यांना कुणाचाही मुलाहिजा न ठेवता ते सुनावतात. मात्र, कार्यकर्त्यांची प्रेमळ मागणी झाली तर अजितदादांसारखा करड्या स्वभावाचा माणूससुद्धा कसा विरघळू शकतो, याचा प्रत्यत आज बीडमधील (Beed) जनतेने घेतला. सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि कार्यकर्त्यांनी मास्क काढून बोलण्याची मागणी करताच ‘मास्कबाबत मी कधी कुणाचं ऐकत नाही. पण काय आहे, मराठवाडा ही माझी सासूरवाडी असल्यामुळे ऐकावे लागते,’ असे सांगून मास्क काढून त्यांनी भाषण केले. (Dhananjay Munde demanded, Ajit Pawar took off his mask and delivered a speech)

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या डिस्टिलरीचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळुंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे आदी उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार यांनी वरील विधान केले.

AJit Pawar
अजित पवारांचे उत्तर नगर जिल्ह्यावर लक्ष्य : पक्ष पदाधिकाऱ्यांना दिले आदेश

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्यात गुढी पाडव्यापासून मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आलेला आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही मंत्री मास्कचा वापर अजूनही करत आहेत. मात्र, पवार हे मास्क वापराबाबत कमालीचे दक्ष असतात. अनेकदा त्यांनी जाहीर सभांमधून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना सुनावले आहे. तसेच आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनाही सूचना केलेल्या आहेत. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांना मास्क वापरण्यासंदर्भात सुचविले होते.

AJit Pawar
कोल्हापूर उत्तरच्या मैदानात उदयनराजेंची उडी अन् फडणवीस करणार सांगता

कर्जत-जामखेड मतदारसंघातील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी थेट आपले पुतणे आमदार रोहित पवार यांना मास्क न वापरण्यावरून स्टेजवरच खडे बोल सुनावले होते. पुण्यातही त्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांसह जनतेला सूचना केलेल्या होत्या. मात्र, हेच करड्या स्वभावाचे अजितदादा कार्यकर्त्यांची प्रेमळ मागणी झाली तर कसे खुलतात, याचा आज प्रत्यय आला. बीडमधील येडेश्वरी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला कार्यकर्त्यांची, तर त्यानंतर खुद्द सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही दादा...मास्क काढून बोला, अशी मागणी केली, त्यावेळी त्यांनी ‘मास्क काढण्याबाबत मी कधी कुणाचं ऐकत नाही. पण काय आहे, मराठवाडा माझी सासूरवाडी असल्यामुळे मला ऐकावे लागत आहे,’ असे सांगून मास्क काढून आपले भाषण पूर्ण केले.

AJit Pawar
शेट्टींना धन्यवाद म्हणून आमदार देवेंद्र भुयार १५ दिवसांतच राष्ट्रवादीच्या वाटेवर

तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या मावळ तालुक्यातील कार्यक्रमात वर्षभरापूर्वी खुद्द शेळके यांनी ‘दादा मास्क काढून बोलावे,’ अशी माझी मागणी आहे, अशी विनंती केली होती. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी मागणी करताच कोरोना आल्यापासून दुसऱ्यांदा अजित पवारांनी मास्क काढून भाषण केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com