
Air India flight crashed : गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला आहे. 242 प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान 700 फुटांवरुन मेघानीनगर ह्या नागरी वस्तीत कोसळलं आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचा ताबा सुटला आणि हे विमान कोसळल्याचं कळतं.
ही दुर्घटना घडण्यापूर्वी विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांनी आपत्कालीनचा संदेश दिला होता. त्यांनी Mayday Call केला होता अशी माहिती मिळाली आहे. विमानाने दुपारी एक वाजून 1.31 मिनिटांनी उड्डाण केल्यानंतर 1.38 मिनिटांनी विमानाचा शेवटचा सिग्नल मिळाला होता. त्यानंतर, ही दुर्घटना घडल्याचे सांगितलं जात आहे.
पायलट "Mayday Mayday" असं का ओरडतात?
विमान आणि एअरलाइन क्षेत्रात काही विशिष्ट कोड वर्ड्स वापरले जातात. हे शब्द पायलटपासून ते इतर क्रू मेंबर्सपर्यंत सर्वजण वापरतात, जेणेकरून तात्काळ आणि योग्य माहिती पोहोचवता येईल. काही शब्द ऐकायला साधे वाटतात, पण त्यांचा अर्थ अतिशय गंभीर आणि आपत्कालीन असतो. अशाच महत्वाच्या शब्दांपैकी एक शब्द आहे – "Mayday Mayday".
पण तुम्हाला माहिती आहे का, "Mayday Mayday" या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे? आणि पायलट हे शब्द कोणत्या प्रसंगी आणि कोणत्या परिस्थितीत वापरतात? आज आपण यामागचं कारण समजून घेणार आहोत.
केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरता
Mayday हा शब्द पायलट केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरतो. एखाद्या गंभीर संकटाच्या वेळी, पायलट "Mayday" हा शब्द सलग तीन वेळा म्हणतो. यामुळे कंट्रोल रूम आणि क्रू मेंबर्स तत्काळ सावध होतात आणि योग्य ती कृती करता येते.
मात्र, पायलट हा शब्द कुठल्याही सामान्य परिस्थितीत वापरत नाही. "Mayday Mayday" हा कोड वर्ड फक्त आणि फक्त अत्यंत गंभीर, जीव धोक्यात घालणाऱ्या परिस्थितीतच वापरला जातो.
आता तुम्ही विचार करत असाल, की पायलट सरळ सांगत का नाही की आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे? त्यामागचं कारण हे की, जर विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हे समजलं की तात्काळ संकट आहे, तर विमानात घबराट, गोंधळ आणि भगदड निर्माण होऊ शकते. त्यामुळे, अशी परिस्थिती टाळण्यासाठी पायलट आणि क्रू सदस्य कोड वर्ड चा वापर करतात. "Mayday Mayday" हा अशा कोड वर्ड्सपैकी एक अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर इशारा देणारा शब्द आहे.
‘Mayday’ या शब्दाचा वापर सर्वप्रथम 1920 साली करण्यात आला होता. त्या वेळी लंडनमधील क्रॉडॉन विमानतळावरील रेडिओ अधिकारी फ्रेडरिक स्टॅनली मॉकफोर्ड यांनी हा शब्द वापरला होता. त्यांनी फ्रेंच शब्द ‘m’aider’ (माझी मदत करा) वरून ‘Mayday’ हा शब्द तयार केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.