Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीसाठी अजितदादांची मोठी खेळी; 'ते' दोन आमदार गळाला? 'मविआ'चे गणित बिघडवणार?

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे हे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी छोट्या पक्षाचे दोन आमदार गळाला लावले आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Legislative Council Election : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला असल्याने आता ताकही फुंकून पिले जात आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला होता. आगामी काळात होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी मोठी चुरस पाहावयास मिळत आहे.

विधानपरिषदेच्या 11 जागेसाठी 12 जण निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असल्याने मोठी चुरस पहावयास मिळत आहे. त्यामुळेच अजित पवार गटाने पॉवरफुल्ल रणनीती आखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे हे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी छोट्या पक्षाचे दोन आमदार गळाला लावले आहेत. त्यामुळे आता येत्या काळात महाविकास आघाडीला विजयासाठी कसरत करावी लागणार आहे. (Vidhan Parishad Election News)

विधान परिषद निवडणुकीत छोट्या पक्षाची मते निर्णायक ठरणार असल्याने सर्व पक्ष ही मते आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजवादी पक्ष दोन, एमआयएम एक, माकप दोन तर बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. त्यामुळे ही मते विधानपरिषद निवडणुकीत महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षाचा डोळा या मतावर असणार आहे.

त्यातच समाजवादी पक्ष व एमआयएम या दोन्ही पक्षांचे मिळून तीन आमदार आहेत. त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यास त्यांच्या विजयाची शक्यता वाढणार आहे. मात्र, एआयएमआयएमने अद्याप त्यांची रणनीती स्पष्ट केलेली नाही. दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे आमदार आणि माजी राज्यसभा खासदार अबू असीम आझम यांची आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट झाल्याची चर्चा आहे.

Ajit Pawar
Vidhan Parishad Election : महायुतीत कुछ तो गडबड है! आघाडीच्या कॉन्फिडन्समुळे नेत्यांचे डाव-प्रतिडाव

या दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार फुटण्याची चर्चा असतानाच आता अजित पवार गटानेच दोन आमदार गळाला लावल्याची चर्चा विधिमंडळाच्या आवारात जॊरात सुरु आहे.

अबू आझमी (Abu Azami) यांच्यासह समाजवादी पक्षाचे रईस शेख सुद्धा आमदार आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मतांची जुळवाजुळव करीत असताना समाजवादी पक्षाची ही दोन मते अजित पवार गटाला वळविण्यात यश आल्याची चर्चा आहे. अबू असीम आझमी हे मुंबईतील मुस्लिमबहुल मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आझमी हे प्रदीर्घ काळ महाराष्ट्र सपाचे अध्यक्ष होते. हा मतदारसंघ मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघात येतो.

Ajit Pawar
Video Nilesh Lanke News : अजित पवारांची भेट झाली का? खासदार नीलेश लंके शरद पवारांच्या भेटीला रवाना...

लोकसभा निवडणुकीत घेतली होती भेट

लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून समाजवादी पक्षासोबत चर्चा सुरु ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी अबू आझमी यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांच्या बैठकीत अबू यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत चर्चा झाली होती, अशी माहिती समोर आली होती. मात्र, त्यानंतर आझमी यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले होते.

Ajit Pawar
Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत कोणाची विकेट पडणार? राजकीय विश्लेषकांचे नेमके म्हणणे काय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com