Maharashtra Politic's : अमित शहांच्या भेटीनंतर खाते वाटपावर तोडगा....अजित पवार गटाला अर्थ व सहकार मंत्रिपद?

शपथविधी होऊन दहा ते अकरा दिवस झाले तरी अद्याप खाते वाटप होऊ शकलेले नाही. त्यामुळे खातेवाटप हा चर्चेचा विषय झाला आहे.
Ajit Pawar and Devendra Fadanvis
Ajit Pawar and Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या खाते वाटपाचा प्रश्न दिल्ली भेटीनंतर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या विरोधामुळे लांबलेले खातेवाटप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्थीने मार्गी लागण्याची शक्यता असून अजित पवार गटाला अर्थ आणि सहकार खाते मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. (Ajit Pawar group will get finance and cooperation minister?)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सहभागी झाली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी ता. २ जुलै रोजी मंत्रीपदाची (Minister) शपथ घेतली आहे. शपथविधी होऊन दहा ते अकरा दिवस झाले तरी अद्याप खाते वाटप होऊ शकलेले नाही. त्यामुळे खातेवाटप हा चर्चेचा विषय झाला आहे.

Ajit Pawar and Devendra Fadanvis
BJP's Bhiwandi Workshop : भाजपचा विधानसभेला १५२ प्लसचा नारा; शिंदे आणि अजित पवार गटाचे काय होणार?

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीला अर्थ आणि सहकार खाते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अजित पवार व इतर नेत्यांच्या दिल्लीवारीनंतर खाते वाटपावर तोडगा निघाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये खाते वाटपावरून मॅरेथॉन बैठका सुरू आहेत.

Ajit Pawar and Devendra Fadanvis
Madha Lok Sabha Constituency : माढा कोण लढणार? अजित पवारांची राष्ट्रवादी की भाजप?

आताही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अजित पवार यांच्यासोबत बैठक सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर खाते वाटपासंदर्भात तोडणार निघण्याची चिन्हे आहेत. एकीकडे, खाते वाटपावर तोडगा निघालेला असला तरी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता मात्र कमी झाली आहे.

Ajit Pawar and Devendra Fadanvis
Maharashtra Politics : राज्यात तिसऱ्या भूकंपाची शक्यता; 'या' कारणामुळे खातेवाटप आणि विस्तार रखडल्याची चर्चा

मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने भाजप आणि शिवसेनेतील आमदारांमध्ये अस्वस्थता वाढू शकते. आज माजी मंत्री बच्चू कडू यांनी तर आपण शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. कारण, मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री होते. बंडात एकनाथ शिंदे यांना साथ देऊनही त्यांच्या पदरात अद्याप मंत्रिपद पडलेले नाही, त्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com