BJP's Bhiwandi Workshop : भाजपचा विधानसभेला १५२ प्लसचा नारा; शिंदे आणि अजित पवार गटाचे काय होणार?

विधानसभा निवडणुकीत भाजपला १५२ जागा जिंकण्यासाठी त्याच प्रमाणात जागा लढवाव्या लागतील.
Bhiwandi BJP workshop
Bhiwandi BJP workshopSarkarnama

Bhiwandi News : भारतीय जनता पक्षाच्या महाविजय-२०२४ या कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन भिवंडीत करण्यात आले आहे. त्या कार्यशाळेत भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत १५२ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे त्यांना जागाही तेवढ्याच लढवाव्या लागतील. मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार आणि त्यांचे काय होणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (BJP's announcement of winning 152 seats in assembly elections in Bhiwandi workshop)

भिवंडीत (Bhiwandi) सध्या भाजपच्या (BJP) राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात भाजपने आगामी निवडणुकीत विधानसभेला (Assembly Election) १५२ जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे, तर लोकसभेला ३५० प्लस जागांचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. भाजपने विधानसभेला २०१४ मध्ये १२१ जागा जिंकल्या होत्या, तर २०१९ मध्ये त्या १०६ झाल्या होत्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या ताकदीवर स्पष्ट बहुमत मिळविण्याचे प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहेत.

Bhiwandi BJP workshop
Madha Lok Sabha Constituency : माढा कोण लढणार? अजित पवारांची राष्ट्रवादी की भाजप?

विधानसभा निवडणुकीत भाजपला १५२ जागा जिंकण्यासाठी त्याच प्रमाणात जागा लढवाव्या लागतील. सध्या भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साथीने राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. भाजपने १५२ जागा जिंकण्याचे उद्दिष्ठ ठेवल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना किता जागा मिळणार, याची उत्सुकता आहे.

Bhiwandi BJP workshop
Kukadi Water : आता बोगदा कसा होणार ; कुकडीचे पाणी पेटणार ? ; डावा कालवा सत्ताधाऱ्यांचा झाला..

एकंदरीतच भाजप आक्रमकपणे संघटनात्मक बांधणी करताना दिसत आहे. तसेच, या शिबिराच्या माध्यमातून मित्रपक्षांवर दबावही आणू पाहत आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या वाटपावरून सध्या ज्या पद्धतीने शह-कटशह दिला जात आहे, त्याचपद्धतीने जागा वाटपातही भाजपचे धोरण आक्रमक राहण्याची शक्यता आहे.

Bhiwandi BJP workshop
Maharashtra Cabinet Expansion : शिवसेना आमदारांचा विरोध असतानाही अजित पवार यांच्याकडेच अर्थखातं?

दरम्यान, भाजपने लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत २५० प्लस जागा जिंकल्या होता. महाराष्ट्रात २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या साथीने ४३ जागा जिंकल्या होत्या, त्यामुळे संपूर्ण देशात भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपने ३५० प्लसचा नारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com