मोठी बातमी : आशिष शेलार यांना राष्ट्रीय स्तरावर संधी; जय शहांचा पुढाकार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्या सूचनेनंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी भरलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतला
Jay Shah-Ashish Shelar
Jay Shah-Ashish ShelarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे चिरंजीव आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे विद्यमान सचिव जय शहा (Jay Shah) यांच्या सूचनेनंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आपला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी भरलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. जय शहा यांनी सांगितल्यानुसार शेलार यांनी बीसीसीआयच्या खजिनदारपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (Ashish Shelar's candidature for BCCI treasurer filed)

आशिष शेलार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पवार-शेलार पॅनेलकडून अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, काही तासांतच त्यांना बीसीसीआयमध्ये खजिनदारपदासाठी अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले, त्यासाठी जय शहा यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जात आहे. शहा यांच्या सूचनेनंतर शेलार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला आणि बीसीसीआयच्या खजिनदारपदासाठी अर्ज भरला.

Jay Shah-Ashish Shelar
MCAच्या निवडणुकीत ट्विस्ट : फडणवीसांच्या निकटवर्तीयास पवारांचे पाठबळ; शेलारांची शिष्टाई यशस्वी!

दरम्यान, बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट संघटनेत नियमाप्रमाणे एकाच वेळी दोन पदांवर राहता येत नाही. त्यामुळे मी ‘एमसीए’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पवार-शेलार पॅनेलकडून अमोल काळे हे अध्यक्षपदाची निवडणूक लढवतील. दीपक पाटील हे आमच्या पॅनेलचे उमेदवार जॉईंट सेक्रेटरी (संयुक्त सचिव) पदावर बिनविरोध निवडून आले आहेत. पवार-शेलार पॅनलसाठी ही सुवार्ता आहे. तसेच, विहंग सरनाईक हेदेखील बिनविरोध निवडून येतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

Jay Shah-Ashish Shelar
एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला जोरदार धक्का : ठाण्यातील बडा मासा लावला गळाला

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अमोल काळे यांच्यासाठी आमदार आशिष शेलार यांच्याशी चर्चा करावी लागली. ज्येष्ठ नेते शरद आणि आशिष शेलार यांच्यात आज दुपारी चर्चा झाली. त्यानंतर शेलार यांनी काळे यांच्या नावाची घोषणा केली. काळे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत शरद पवार यांनी फडणवीस यांच्या विश्वासू सहकाऱ्याच्या पाठीशी आपली ताकद उभी केल्याची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com