ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेला (shivsena) मोठा धक्का दिल्यानंतर त्यांना आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) वळविला आहे. ठाणे (Thane) ग्रामीणचा राष्ट्रवादीचा महत्वाचा मोहोरा आणि धडाधडीची तोफ त्यांनी आपल्या गोटात दाखल करून घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) ऊर्फ बाळ्यामामा यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. (NCP's Thane Rural District President Suresh Mhatre joins Shinde group)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटली. त्या वेळी त्यांनी आपला पाठिंबा हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारला जाहीर केला. त्यानंतर त्यांचा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश झाला. म्हात्रे यांच्या हाती भगवा झेंडा देऊन त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
विशेष म्हणजे प्रवेशानंतर काही मिनिटांमध्येच सुरेश म्हात्रे यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीचे पत्र बाळ्यामामा यांना सुपूर्द करण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटात प्रवेश करताच म्हात्रे यांच्यावर तातडीने मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या प्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, माजी आमदार अशोक पाटील, ठाणे जिल्हाप्रमुख, प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, उपनेते प्रकाश पाटील, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, शहापूर शहरप्रमुख आकाश सावंत तसेच मुरबाड-शहापूर तालुक्यांतील सर्व शिवसेना प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.