Mahayuti : महायुतीसाठी विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची; खासदार, विधानपरिषदेच्या 'या' आमदारांना उतरवले रिंगणात

Mahayuti Election Strategy Candidates: राज्यात विविध ठिकाणी मित्रपक्षांचे उमेदवारच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तर दुसरीकडे महायुतीमधील मित्रपक्षाने खासदार व विधानपरिषदेच्या सदस्यांना निवडणूक रिंगणात उतरवीत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
Rajesh vitekar, Bhavana Gawali, Ram shinde, chandrashekhar Bawankule, Milind  
 Deora
Rajesh vitekar, Bhavana Gawali, Ram shinde, chandrashekhar Bawankule, Milind Deora Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली. त्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागावाटपाचा पेच अजूनही कायम असल्याचे पुढे आले आहे. यातून पक्षांतर्गत वाद, मित्रपक्षांतील कलह वारंवार समोर येत आहेत.

राज्यात विविध ठिकाणी मित्रपक्षांचे उमेदवारच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तर दुसरीकडे महायुतीमधील मित्रपक्षाने खासदार व विधानपरिषदेच्या सदस्यांना निवडणूक रिंगणात उतरवीत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

भाजपने या मध्ये आघाडी घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विधानपरिषदेचे सदस्य असताना त्यांना विदर्भातील कामठी मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे तर दुसरीकडे माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) हे विधानपरिषदेचे सदस्य असताना त्यांना ही कर्जत जामखेड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची लढत आमदार रोहित पवारविरुद्ध होत आहे.

शिवसेनेने नुकतेच राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेल्या मिलिंद देवरा यांना पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांना वरळी मतदारसंघातून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उतरविण्यात आले आहे, तर दुसरीकडे रिसोड मतदारसंघातून नुकत्याच विधानपरिषदेवर निवडून आलेल्या भावना गवळी यांना या ठिकाणाहून संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या ठिकाणच्या निवडणुकीकडे लागले आहे.

महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून परभणी जिल्ह्यातील पाथरी मतदारसंघातून नुकतेच विधान परिषदेवर निवडून गेलेल्या राजेश विटेकर यांना पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरवले आहे. या मतदार संघातून सुरुवातीला राजेश विटेकर यांच्या मातोश्री निर्मला विटेकर यांना संधी देण्यात आली होती. त्याठिकाणी उमेदवार बदलून राजेश विटेकर यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे.

Rajesh vitekar, Bhavana Gawali, Ram shinde, chandrashekhar Bawankule, Milind  
 Deora
MVA Nagpur : शरद पवारांनी पंढरपूर, हिंगणा घेतले, आता पूर्व नागपूरचे काय होणार?

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपने दोन जणांना तर शिवसेनेने दोन जणांना तर राष्ट्रवादी काँग्रेसने एक अशा पाच जणांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी होत असलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rajesh vitekar, Bhavana Gawali, Ram shinde, chandrashekhar Bawankule, Milind  
 Deora
Maha Vikas Aghadi News : काँग्रेस म्हणतंय 80-85, ठाकरे गटाची वाढली काळजी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com