Assembly Winter Session: नागपूर अधिवेशनाची सूत्रे कोणाच्या हाती ? फडणवीसांनी माईकवर घेतलेल्या ताब्यानं सगळंच सांगितलं...

Eknath Shinde-Devendra Fadnavis -Ajit Pawar: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरु होत आहे.
Eknath Shinde-Devendra Fadnavis -Ajit Pawar
Eknath Shinde-Devendra Fadnavis -Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: नागपूर हिवाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरूवात होत असून, तत्पूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांची बुधवारी पत्रकार परिषद झाली. सत्ताधारी-विरोधकांनी पत्रकार परिषदेतून टीका करत एकप्रकारे एकमेकांच्या तयारीची चाचपणी केली. यात सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेची उत्सुकता होती. देवेंद्र फडणवीस यांचे होम टाऊन होत असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनाची सूत्रे कोणाच्या हाती ? याची उत्सुकता होती. मात्र, पत्रकार परिषदेत महाराष्ट्राला आणि विरोधकांना त्याचे उत्तर मिळाले.

भाजप-शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट - राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती सरकारची नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वीची पत्रकार परिषद सायंकाळी झाली. ही पत्रकार परिषद 52 मिनिटे 45 सेंकद झाली. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार होते. ही पत्रकार परिषद सुरू होण्यापासूनच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हातातच माईक होता. त्यांनीच पत्रकार परिषदेला सुरूवात केली.

फडणवीस सुरूवातीला तब्बल 12 मिनिटे 55 सेकंद बोलले. संपूर्ण पत्रकार परिषदेत ते तब्बल 20 मिनिटे बोलले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताब्यात माईक आला. ते 18 मिनिटे बोलले. मुख्यमंत्री शिंदे संपूर्ण पत्रकार परिषदेत सुमारे 23 मिनिटे बोलले. उपमुख्यमंत्री पवार हे पत्रकार परिषदेत सुमारे 10 मिनिटे बोलले. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या हातात प्रत्येकी पाच वेळा, तर उपमुख्यमंत्री पवार यांच्या हातात चार वेळा माईक गेला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde-Devendra Fadnavis -Ajit Pawar
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी वडेट्टीवारांच्या आरोपांमधली हवाच काढली; म्हणाले," ज्यांना मॅडमची परवानगी घेतल्याशिवाय..."

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरूवातीला विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती सांगत विरोधकांच्या अपूर्व अभ्यासावर टीकेची झोड उठवली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. राज्यात लाचेचे प्रकार वाढले म्हणजे भ्रष्टाचार वाढलाय का, या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे हे अडखळले.

यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हातातून माईक घेत पत्रकारांच्या प्रश्नांला उत्तर दिले आणि शिंदेला सावरले. यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे माईक दिला. मुख्यमंत्री शिंदे यांनी माईक घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा माईक घेत मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने बोलतो असे सांगून माईकचा ताबा घेतला. बोलणे झाल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माईक खाली ठेवला.

मुख्यमंत्री शिंदे-उपमुख्यमंत्री फडणवीस-मुख्यमंत्री शिंदे यांच्यात माईक घेण्याची स्पर्धा झाली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हातातून उपमुख्यमंत्री पवार यांनी माईक घेतला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड (itendra Awhad) यांच्या वाढत्या पोटावर पवार यांनी शेलक्या भाषेत टीका केली. यावेळी पवारांकडून मुख्यमंत्री शिंदे यांनी माईक घेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिला.

यावेळी माईकवर ताबा मिळवण्याची स्पर्धा मुख्यमंत्री शिंदे-उपमुख्यमंत्री पवार यांच्यात रंगली. नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी महायुती सत्ताधाऱ्यांची झालेली पत्रकार परिषदेत माईकवर ताबा मिळवण्याची स्पर्धा मुख्यमंत्री आणि दोघा उपमुख्यमंत्र्यांमध्ये दिसली असली, तरी संपूर्ण अधिवेनशात सत्ताधारी महायुतीकडून उपमुख्यमंत्री फडणवीस यांचीच पकड असणार असेच चित्र पाहायला मिळू शकते.

(Edited by- Ganesh Thombare)

Eknath Shinde-Devendra Fadnavis -Ajit Pawar
Assembly Winter Session: 'पुढच्या वर्षी विरोधकांसाठी चहापान नाही तर...'; फडणवीसांनी अधिवेशनापूर्वीच विरोधकांना ललकारलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com