राजकारणात यायचं असेल तर तुम्ही लठ्ठ, मठ्ठ आणि निगरगट्ट असणे गरजेचे

काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार (Ulhas Pawar) यांनी याबाबतची एक आठवण 'सरकारनामा'शी बोलताना सांगितली आहे.
Babasaheb Bhosale, Ex cm of Maharashtra
Babasaheb Bhosale, Ex cm of MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्र्यांपैकी विनोदबुद्धी आणि हजरजबाबी कोण होते असा प्रश्न विचारल्यास चटकन नाव आठवत ते बाबासाहेब भोसले यांचे. १९८० साली पहिल्यांदा आमदार झालेले बाबासाहेब १९८२ साली थेट मुख्यमंत्री झाले होते. ते उणे-पुरे १३ महिनेच या पदावर होते, मात्र याकाळात महाराष्ट्रभर चर्चा झाली ती त्यांच्या विनोदबुद्धीची. हजरजबाबी असलेले बाबासाहेब बोलायलाही तेवढेच मनमोकळे, दिलखुलास आणि काहीसे फटकळही होते. त्यांच्या याच तिन्ही गुणांचा एकत्रित अनुभव माजी खासदार आणि दैनिक लोकसत्ताचे माजी संपादक विद्याधर गोखले यांना आला होता.

काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार (Ulhas Pawar) यांनी याबाबतची एक आठवण 'सरकारनामा'शी बोलताना सांगितली आहे. यंदा दिवाळी निम्मित्त 'राजकीय फटाके' अंतर्गत उल्हास पवार यांची विषेश मुलाखत आयोजित करण्यात आली होती यात ते बोलत होते. पवार यांची ही सविस्तर मुलाखत प्रसिद्ध झाली असून ती आपण 'सरकारनामा'च्या फेसबुक आणि युट्यूब चॅनेलवर पाहू शकता.

Babasaheb Bhosale, Ex cm of Maharashtra
`मंत्रीपदासाठी डायरेक्ट इंदिरा गांधींनी तुझं नाव फायनल केलंय!`

पवार म्हणाले, बाबासाहेब मुख्यमंत्री होते. त्यांना भेटायला विद्याधर गोखले देखील आले होते. मी ही तिथंच बसलो होतो. तेवढ्यात तिथं बाबासाहेबांचे तिन्ही मुलं तिथं आले. त्यांनी आम्हाला दोघांना त्यांची ओळख करुन दिली. मोठा मुलगा अशोक हा आर्किटेक्ट इंजिनिअर होता. तो अमेरिकेवरुन शिकून आला होता. दुसरा मुलगा दिलीप. ते उच्च न्यायालयात वकिल होते. तर धाकटे चिरंजीव राजन, हे MBBS, MD गोल्ड मेललिस्ट होते. तिघेही अत्यंत हुशार. स्वतंत्र वृत्तीने काम करणारे, बुद्धीमान मुले होती. बाबासाहेबांनी अभिमानाने आपल्या मुलांची ओळख करुन दिली.

मात्र विद्याधर गोखलेंना काहीसे आश्चर्य वाटले. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची तीन मुले आणि त्या तिघांपैकी एकही राजकारणात नव्हते. त्यांनी न राहुन बाबासाहेबांना विचारले, यातील राजकारणात तुमच्यासारखे कोणीच नाही का?

Babasaheb Bhosale, Ex cm of Maharashtra
बिअर बारमुळे हुकले होते कलमाडींचे युवक काँग्रेसचे अध्यक्षपद...

पवार सांगतात, त्यावेळी बाबासाहेब अगदी खंताने म्हणाले, नाही ना... कारण राजकारणात येण्यासाठी किंवा असण्यासाठी तुमच्याकडे तीन गुण असणे आवश्यक असते. त्यावर न राहुन पुन्हा गोखलेंनी विचारले, कोणते तीन गुण ओ बाबासाहेब? मुख्यमंत्री महोदय म्हणाले, लठ्ठ, मठ्ठ आणि निगरगठ्ठ. अशा तीन गोष्टी. आणि यातील एकही गोष्ट माझ्या मुलांच्यात नाही. बाबासाहेबांच्या या उत्तरावर तिथं एकचं हशा पिकला. उपस्थित असलेले सगळे जण खो-खो पोट धरुन हसायला लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com