‘रश्मी शुक्लांची फडणवीस भेट म्हणजे कुठंतरी पाणी मुरतंय’

ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार या गद्दारानी पाडलं, याला कोणतंही कारण नाही. यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार पाडलं.
Devendra Fadnavis- Rashmi Shukla-Bhaskar Jadhav
Devendra Fadnavis- Rashmi Shukla-Bhaskar JadhavSarkarnama

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी सागर बंगल्यावर येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणे; म्हणजे कुठं तरी पाणी मुरतंय, असा आरोप शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला. (Bhaskar Jadhav criticizes Devendra Fadnavis over IPS officer Rashmi Shukla's visit)

फोन टॅपिंग प्रकरणातील वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला आणि भाजपचे मोहित कंबोज यांनी बुधवारी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावरून भास्कर जाधवांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येत असताना फोन टॅपिंग केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. त्या सध्या प्रतिनियुक्तीवर केंद्र सरकारमध्ये गेलेल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना या फोन टॅपिंग संदर्भात चौकशीसाठी अनेकदा बोलावूनही त्या मुंबईत आल्या नव्हत्या. मात्र महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे गट आणि भाजपचे सरकार सत्तेवर येताच त्यांना मुंबईत आल्या. त्यामुळे त्या महाराष्ट्रात परत येणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Devendra Fadnavis- Rashmi Shukla-Bhaskar Jadhav
‘अहो, शंभूराज देसाई इकडे लक्ष द्या; गुवाहाटीच्या चर्चा नंतर करा’

भास्कर जाधव म्हणाले की, ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार या गद्दारानी पाडलं, याला कोणतंही कारण नाही. यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार पाडलं, जनता हे सर्व बघतेय, उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं, तेच निर्णय यांनी ऑगस्टमध्ये जाहीर केले. खुल्या मैदानात मी या बंडखोरांबाबत बोलेन.

Devendra Fadnavis- Rashmi Shukla-Bhaskar Jadhav
एक मिनिट...शंभूराज, आपण एकत्र काम केलंय : अजित पवारांनी फटकारले

दीपक केसरकर हे सध्या कंट फुटल्यासारखे कधीपासून बोलत आहेत. ते जनता पाहते आहे. विधानसभा अध्यक्षांनी सर्वांचे मत ऐकले पाहिजे. हे अध्यक्ष अंतरज्ञानी दिसतात, समोरच्याच्या मनात काय आहे, ते त्यांना दिसते, असा टोलाही भास्कर जाधव यांनी हंगामी पीठासिन अधिकाऱ्यांना लगावला. मध्यंतरी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. न्यायालयीन लढाईमुळे शेतकऱ्यांना मदत देण्यास वेळ झाला आहे. राजकिय दौरे काढले जात आहेत. दौरा असेल तर प्रामुख्याने बंडखोरांच्या मतदारसंघात असतात, अशी टीकाही भास्कर जाधव यांनी सरकारवर केली.

Devendra Fadnavis- Rashmi Shukla-Bhaskar Jadhav
भुजबळसाहेब, आमच्याकडे पांढऱ्या दाढीचा फार सन्मान : फडणवीसांच्या विधानाने चर्चेला उधाण

भास्कर जाधवांनी शंभूराज देसाईंना सुनावले

अहो शंभूराज देसाई, इकडे लक्ष द्या. गुवाहाटीच्या राहिलेल्या चर्चा नंतर करा, असे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना सुनावले. त्याला शंभूराज देसाई यांनीही उत्तर दिले. ‘अहो, भास्करराव, तुमच्याच विषयावार चर्चा सुरू आहे. मागच्या सरकारमध्ये निधी मिळाला नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. त्या उत्तरावर भास्कर जाधव अक्षरशः तुटून पडले. ‘अहो, शंभूराज काही तरी वाटलं पाहिजे, तुम्हाला. तुम्ही तर सरकारमध्ये मंत्री होता,’ असे जाधवांनी देसाईंना सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com