चंद्रकांत पाटील यांची ‘ती’ चूक सुप्रिया सुळे यांनी सुधारली!

काल चुकून जसे इंदापूरचे आमदार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'मुख्यमंत्री' म्हणून केला होता, तसेच मीही असंच आज बोलून गेलो.
Chandrakant Patil-Supriya Sule
Chandrakant Patil-Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आज (ता. १५ फेबुवारी) पुण्यात एका कार्यक्रमासाठी व्यासपीठावर एकत्र आले होते. याच कार्यक्रमात पाटील यांच्याकडून सुप्रिया सुळे यांचा उल्लेख ‘राज्यसभा’ खासदार असा झाला अन् ही अनवधानाने झालेली चूक खुद्द सुप्रिया सुळे यांनीच चंद्रकांतदादांच्या लक्षात आणून दिली. (Chandrakant Patil's 'this' mistake was corrected by Supriya Sule!)

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना यांच्यातील इन्कमिंग-आऊटगोईंग, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, स्वबळाचा नारा यांनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते एकत्र आले होते.

Chandrakant Patil-Supriya Sule
महाआघाडी सरकार पाडण्यास मदत न केल्यास टाईट करू : भाजप नेत्यांनी धमकावल्याचा राऊतांचा गौप्यस्फोट

पुण्यात '३km' च्यावतीने ‘जनसेवक पुण्याचा' या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जनसेवक पुण्याचा या ऑनलाईन पोलमध्ये 2 लाख पुणेकरांनी मते नोंदवली आहेत. यातून विजेत्या नगरसेवकांचा सन्मान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सकाळ माध्यम समूहाचे सीईओ उदय जाधव, कार्यकारी संपादक शीतल पवार, राजकीय पक्षांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Chandrakant Patil-Supriya Sule
वर्ध्यात मनसेला खिंडार : उपजिल्हाध्यक्षांसह ५० पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातीला सुळे यांचा उल्लेख राज्यसभा खासदार असा केला. पण पाठीमागे बसलेल्या सुळे यांनी राज्यसभा नाही, लोकसभा असा उल्लेख करत तात्काळ चूक लक्षात आणून दिली. त्यावर आपली चूक सुधारत पाटील म्हणाले, ‘काल चुकून जसे इंदापूरचे आमदार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'मुख्यमंत्री' म्हणून केला होता, तसेच मीही असंच आज बोलून गेलो. पण 'मी भविष्यातील वाक्य आत्ताच बोलल्याचा' उल्लेख करत सुप्रिया सुळे यांना मिश्किल शब्दांत प्रतिसाद दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com