Assembly session
Assembly sessionSarkarnama

Eknath Shinde In Assembly Session: नाना पटोलेंचा राजीनामा ‘ये अंदर की बात है’; मुख्यमंत्र्यांचे सत्ताबदलावर नेमके बोट....

Eknath Shinde News: मी नानांना डबल धन्यवाद देतो. कारण आज मी येथे उभा राहून जो बोलतो आहे, त्यामागे त्यांचेही......
Published on

Mumbai News : विधानसभेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी आज (ता. ३ ऑगस्ट) सभागृहात विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. विरोधी पक्षनेतेच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यात त्यांनी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याचा उल्लेख करत ‘नानाभाऊंचा राजीनामा अंदर की बात है…’ असे म्हणत युती सरकार सत्तेवर येण्यामागचे कारणच समोर आणले. (Chief Minister Eknath Shinde comment on the change of power in the state)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी वडेट्टीवार यांना आसनावर नेऊन बसवत अभिनंदन केले. विशेष म्हणजे मागील विरोधी पक्षनेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या खांद्यावर हात टाकत त्यांना जागेवर नेले. यावेळी सत्ताधारी बाकावरून काही कॉमेंटही झाल्या. त्यामुळे सभागृहात हास्याचे फवारे उडत होते.

Assembly session
Eknath Shinde on Vijay Wadettiwar : वडेट्टीवारांचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना झोडपले..

विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते केल्यामुळे मनाला फार लावून घेऊ नका. पण त्यांना सारखं ‘ना ना’ करू नका. त्यांना जरा मोकळेपणाने काम करू द्या, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन ठरावावर बोलताना केले. पुढे ते म्हणाले की, नाना पटोलेंचा स्वभाव तसा चांगला आहे. तेही विरोधी पक्षनेते होते. (चूक लक्षात येताच डोक्यावर हात मारत) ते अध्यक्ष होते. त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण, त्यांनी जे केलं, ते राज्यासाठी चांगलं केलं. आम्ही तुमचे आभारी आहोत. नानांचा राजीनामा ‘ये अंदर की बात है.... पण मी नाना हमारे साथ है,’ असे म्हणणार नाही.

Assembly session
Solapur Loksabha : लोकसभेसाठी इच्छूक अमर साबळेंवर सोलापुरातील भाजपच्या हॅट्‌ट्रीकची जबाबदारी!

शिंदे म्हणाले की, विरोधी बाकावर बसल्यावर नाना पटोले आमच्याशी भांडतात, बोलतात. पण आम्ही जेव्हा वैयक्तीक भेटतो, तेव्हा ते दिलखुलासपणे मनात काही न ठेवता वागणारा नेता म्हणून नानांचा नावलौकिक आहे. मी नानांना डबल धन्यवाद देतो. कारण आज मी येथे उभा राहून जो बोलतो आहे, त्यामागे त्यांचेही...... असे अर्धवट बोलत मुख्यमंत्र्यांनी सर्वकाही सांगून टाकले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com