D.K. Shivakumar : बारामतीपेक्षाही मजबूत डी.के. शिवकुमारांचा गड; आठव्यांदा आमदार, फक्त शेवटच्या दिवशीच करतात प्रचार

Ajit Pawar News : शिवकुमारांचा सव्वा लाख मताधिक्यांनी विजय
Ajit Pawar, D. K. Shivakumar
Ajit Pawar, D. K. ShivakumarSarkarnama

Karnataka Election Result : कर्नाटक विधानसभेत काँग्रेसने मोठी बाजी मारली आहे. या निवडणुकीत काँग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार तब्बल आठव्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी एक लाखाहून अधिक मताधिक्यांनी विजय मिळविला आहे. यापूर्वीही ते मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले आहेत. निवडणुकीत ते आपल्या मतदारसंघात फक्त शेवटच्या दिवशी प्रचार करतात. या धडाक्याने कर्नाटकचे शिवकुमार आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात तुलना होऊ लागली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) बारामती विधानसभेतून सातवेळा निवडून आले आहेत. निवडणुकीदरम्यान पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर उमेदवारांचा महाराष्ट्रभर प्रचार करतात. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात ते आपल्या बारामती (Baramati) मतदारसंघात प्रचार करतात. तरीही ते मोठ्या मताधिक्यांनी विजयी होत आले आहेत. २०१९ मध्ये अजित पवार यांनी १ लाख ६५ हजार मतांनी विजय मिळवून विरोधकांची अनामत जप्त केली होती. त्यामुळेच बारामती आणि अजित पवार हे समिकरण तयार झाले आहे. तसेच कर्नाटकमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचाही कुनकपुरा हा मतदारसंघ आहे. Karnataka Election Result

Ajit Pawar, D. K. Shivakumar
Karnataka Election Result 2023 : जालंधर लोकसभेची पोटनिवडणूक जिंकणाऱ्या 'आप'ची कर्नाटकात हवा फूस्स !

कर्नाटक निवडणुकीत (Karnataka) काँग्रेसने बहुमत प्राप्त केले आहे. विधानसभेच्या २२४ पैकी १३६ जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. त्यामुळे काँग्रेसची सत्ता स्थापन होणार, यात काही शंका नाही. दरम्यान, काँग्रेसच्या या विजयात प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांचा सिंहाचा वाटा असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी आखलेल्या रणनितीला काँग्रेसच्या इतर नेत्यांनी साथ दिली. "राज्यात आम्ही कुठल्याही पक्षाचा पाठिंबा घेणार नाही. काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करेल", असा विश्वास शिवकुमारांनी व्यक्त केला होता. तो त्यांनी आता सार्थ करून दाखविला आहे. (Karnataka Election)

Ajit Pawar, D. K. Shivakumar
Karnataka Election Result : एकही दिवस प्रचार न करता...मतदारसंघात न जाताही मिळविला काँग्रेस उमेदवाराने विजय

डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) आपल्या बालेकिल्ल्यातून आठव्यांदा निवडून आले आहेत. येथे एक लाख ९० हजार ६२३ मतदान झाले आहे. त्यातील तब्बल एक लाख ४३ हजार २३ मते शिवकुमार यांना मिळाली आहेत. तर दुसऱ्या स्थानावरील जेडीएसच्या उमेदवाराला २० हजार ६६१ मते मिळाली आहेत.

यावेळी शिवकुमारांनी तब्बल एक लाख २२ हजार ३६२ मतांनी विजय संपादन केला आहे. तब्बल ७५ टक्के मते घेऊन विजयी झालेले शिवकुमार यांनी आपल्या मतदारसंघात फक्त शेवटच्या दिवशी प्रचार केला. त्यानंतरही त्यांनी इतर सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com