Karnataka Election Result : एकही दिवस प्रचार न करता...मतदारसंघात न जाताही मिळविला काँग्रेस उमेदवाराने विजय

कुलकर्णी यांना ८९ हजार ३३३ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमृत देसाई यांना ७१ हजार २१९ मते मिळाली.
Vinay Kulkarni
Vinay KulkarniSarkarnama
Published on
Updated on

बेळगाव : एकही दिवस मतदारसंघात न जाता माजी मंत्री तथा काँग्रेसचे उमेदवार विनय कुलकर्णी यांनी धारवाडची लढाई जिंकली आहे. योगेश गौडा हत्या प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या कुलकर्णी यांना न्यायालयाने धारवाड जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे कुलकर्णी यांना मतदारसंघात प्रचारासाठी जाता आले नाही. त्यांच्या पत्नी शिवलिला, तीन मुले व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून कुलकर्णी यांना निवडून आणले आहे. त्यामुळे कुलकर्णी यांचा विजय राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. (Congress candidate Vinay Kulkarni wins from Dharwad)

मुळात कुलकर्णी यांना धारवाड (Dharwad) जिल्‍ह्यात प्रवेश करण्यास बंदी असूनही कॉंग्रेस (Congress) पक्षाने त्याना उमेदवारी दिली होती. शिवाय धारवाड जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली. त्यामुळे धारवाड जिल्ह्यातील प्रवेश बंदी उठविण्याच्या मागणीसाठी कुलकर्णी यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पण न्यायालयाने त्यांच्यावरील बंदी कायम ठेवली होती.

Vinay Kulkarni
Mamata Banerjee News : आता भाजपचा 'या' दोन राज्यातही पराभव होणार : ममता बॅनर्जींचं भाकीत!

न्यायालयाच्या निर्णयामुळे विनय कुलकर्णी यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीही मतदारसंघात जाता आले नव्हते, त्यांच्या वतीने पत्नी शिवलिला यांनी कार्यकर्त्यांसह जाऊन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर इंटरनेट व तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी मतदारांसोबत ऑनलाईन संपर्क साधला. पण या सर्व घटनांमुळे कुलकर्णी यांच्याबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण झाली, त्याचाही फायदा कुलकर्णी यांना झाला. कुलकर्णी यांना ८९ हजार ३३३ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमृत देसाई यांना ७१ हजार २१९ मते मिळाली.

Vinay Kulkarni
Karnataka Result : कर्नाटकच्या निकालाने वाढविले शिवसेना-भाजप नेत्यांचे टेन्शन

विधानसभेच्या २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत विनय कुलकर्णी यांचा पराभव झाला होता. अमृत देसाई यांनीच त्यांचा पराभव केला होता. निवडणुकीआधी काही वर्षे म्हणजे १५ जून २०१६ रोजी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांची धारवाड येथे हत्या झाली होती. त्यावेळी विनय कुलकर्णी हे मंत्री होते. या हत्या प्रकरणाशी त्यावेळी कुलकर्णी यांचे नाव जोडण्यात आले होते.

Vinay Kulkarni
Devdutt Nikam News : राष्ट्रवादीला आव्हान देत निवडून आलेल्या देवदत्त निकम यांचा वळसे पाटलांच्या हस्ते सत्कार

राज्यात २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली, त्यावेळी योगेश गौडा हत्या प्रकरण सीबीआय कडे सोपविण्यात आले. सीबीआयकडून त्यावेळी कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी डिसेंबर २०२० मध्ये कुलकर्णी यांना अटक करण्यात आली. सुमारे दीड वर्षे कुलकर्णी हे बेळगावातील हिंडलगा कारागृहात होते. ऑगस्ट २०२२ मध्ये कुलकर्णी यांना जामीन मिळाला होता. पण, न्यायालयाने धारवाड जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली होती. पण, बंदी असूनही कुलकर्णी लढले व जिंकलेही....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com