काँग्रेसकडून पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव आला होता : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

ही निवडणूक आम्ही कोणत्याही परिस्थिती लढवणार आहोत, असे त्यांना सांगितले
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा विनंतीवजा प्रस्ताव महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेस पक्षाकडून (Congress) आमच्याकडे आला होता. मात्र, आम्ही ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही. ही निवडणूक आम्ही कोणत्याही परिस्थिती लढवणार आहोत, असे त्यांना सांगितले, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला. (Congress had proposed to hold by-elections without any opposition : Chandrakant Patil)

कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत आमदार पाटील बोलत होते. चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूल लागली आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षासाठी विशेषतः पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रयत्न चालवले होते. त्यासाठी त्यांनी आपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचा चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याला संदर्भ होता. त्यांनी काँग्रेसकडून तसा प्रस्ताव आला असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करून टाकले.

Chandrakant Patil
कोल्हापूर उत्तरसाठी पक्षश्रेष्ठींना दोन नावे कळवली; पण आम्ही या नावावर आग्रही!

दरम्यान, कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपने दोन नावे पक्षाच्या केंद्रीय समितीकडे पाठवली आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांच्या नावाचा समावेश आहे. कदम यांच्या नावावर आमचे एकमत झाल्याचे आम्ही दिल्लीला कळविले आहे. पण अंतिम निर्णय अजून झालेला नाही. आज (ता. १८ मार्च) रात्री होणाऱ्या पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीनंतर अधिकृत उमेदवाराची घोषणा होईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

Chandrakant Patil
'मविआ'चे २५ आमदार भाजपच्या संपर्कात; प्रवेशाचा मुहूर्तही ठरला : दानवेंचा गौप्यस्फोट

ही पोटनिवडणूक दुरंगी होईल की तिरंगी, हे सांगण्याइतका मी जाणकार नाही. पण, महाविकास आघाडी सध्या प्रचंड घाबरलेली आहे. ते इतरांना उभे राहू देतील, असे काही वाटत नाही. सर्वांच्या हाता-पाया पडून एकच उमेदवार उभा करतील. आम्हालाही त्यांनी विनंती केली होती कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक बिनविरोध करू. पण, आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक दुरंगी की तिरंगी होणार, याबाबत सांगता येणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Chandrakant Patil
कंस अन् रावणाची प्रतिज्ञा टिकली नाही; तुम क्या चीज हो शरदबाबू?

ते म्हणाले की, पंढरपूर पॅटर्नमध्ये आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचविण्याचे काम केले होते. राज्यातील भाजपचे बहुतांशी नेते पंधरा-पंधरा दिवस त्या मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. ते प्रत्येक नागरिकांपर्यत पोचले हेाते. त्या काळात त्यांनी ‘मोदी है तो मुमकीन है’ हे जनतेला पटवून दिले होते, तोच पंढरपूर पॅटर्न आम्ही कोल्हापुरात राबविणार आहोत.

Chandrakant Patil
कोल्हापूरची पोटनिवडणूक पंचरंगी; करूणा शर्मा, अभिजित बिचुकलेही रिंगणात

प्रचारासाठी राज्यातीलच नेते येणार

आमदार पाटील म्हणाले की, पोटनिवडणुकीच्या प्रचाराला केंद्रीय नेते येण्याची परंपरा नाही. पण, राज्यातील देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, पंकजा मुंडे प्रचाराला येणार आहेत. त्यामुळे आम्ही ही पोटनिवडणूक जिंकणार आहोत. महाआघाडीच्या कारभावर जनता नाराज आहे. वीज कनेक्शन तोडणी, एसटीचा संप, कायदा व सुव्यवस्था, मराठा समाज आरक्षण आदी प्रश्नांवरून समाजातील विविध घटकांमध्ये नाराजीची भावना आहे. ओबीसी आणि धनगर समाजाचीही सरकारकडून फसवणूक करण्यात येत आहे, त्यावर आम्ही पोटनिवडणुकीत आवाज उठवणार आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com