AAP on Swati Maliwal : 'जराही लाज असेल तर..' ; आम आदमी पार्टीचा स्वाती मालिवाल यांच्यावर जोरदार पलटवार!

Swati Maliwal on Atishi Marlena : आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी आतिशी यांच्या निवडीवर टीका केलेली आहे.
AAP on Swati Maliwal
AAP on Swati MaliwalSarkarnama
Published on
Updated on

Aam Aadmi Party Politics : आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आज दिल्लीच्या भावी मुख्यमंत्रिपदी आतिशी मार्लेना यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केला गेला. आपचे राष्ट्रीय संजोयक आणि दिल्लीचे मुख्यंमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला होता, ज्यास सर्व आमदारांनी पाठिंबा दर्शवला.

दरम्यान, आतिशी यांच्या निवडीवर आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी टीका केली आहे. ज्यानंतर आता आम आदमी पार्टीनेही मालिवाल यांना राज्यसभा खासदारकीचा राजीनामा मागत, सुनावले आहे.

आम आदमी पार्टीचे(Aam Aadmi Party) वरिष्ठ नेते दिलीप पांडे यांनी म्हटले की, आम आदमी पार्टीकडून राज्यसभेवर पाठवल्या गेल्यानंतरही मालिवाल मालिवाल या भाजपची स्क्रीप्ट वाचत आहेत. स्वाती मालिवाल आम आदमी पार्टीकडून राज्यसभेची उमेदवारी घेतात, परंतु प्रतिक्रियेसाठी भाजपकडून स्क्रीप्ट घेतात. जर त्यांना जराही लाज वाटत असेल, तर त्यांनी राज्यसभा खासदरकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि भाजपच्या तिकीटावर राज्यसभेचा मार्ग निवडला पाहिजे. जर त्यांना राज्यसभेत राहायचे असेल तर त्यांनी भाजपकडून तिकीट घेतलं पाहिजे.

AAP on Swati Maliwal
Swati Maliwal News : आतिशींची मुख्यमंत्रिपदी निवड होताच, स्वाती मालिवाल यांनी साधला निशाणा, म्हणाल्या..

राजीनाम्याच्या मागणीवरून स्वाती मालिवाल(Swati Maliwal) आणि आम आदमी पार्टीमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. कारण, मागील काही दिवसांमध्ये स्वाती मालिवाल यांनी केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांच्यावर मुख्यंत्री निवासस्थानी माराहण केल्याचे आरोप केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते.

याशिवाय आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी आतिशी यांच्या निवडीवर जोरदार टीका केलेली आहे आणि आजचा दिवस अतिशय दु:खद दिवस असल्याचं म्हटलं आहे.

AAP on Swati Maliwal
Atishi Marlena : पहिल्यांदा आमदार, केजरीवाल तुरुंगात असताना पक्ष सांभाळला, आता थेट 'CM'पदी वर्णी; आतिशी यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास

स्वाती मालिवाल यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले की, दिल्लीला एक अशा महिला मुख्यमंत्री आज लाभल्या आहेत, ज्यांच्या कुटुंबाने दहशतवादी अफजल गुरु याला वाचण्यासाठी प्रदीर्घ लढा दिला. त्यांच्या आई-वडिलांनी अफजल गुरुला वाचवण्यासाठी राष्ट्रपतींकडे दया याचिकेचा अर्जही केला होता. त्यांच्या मते अफजल गुरु निर्दोष होता आणि त्याला राजकीय षडयंत्रातून अडकवलं गेलं होतं. तसं आतिशी मार्लेना या केवळ ‘Dummy CM’ आहेत. तरीही हा मुद्दा देशाच्या सुरक्षेशी निगडीत आहे. देव दिल्लीचं रक्षण करो. असं स्वाती मालिवाल यांनी म्हटलेलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com