Poonam Mahajan : प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे षडयंत्र? पूनम महाजन काय म्हणाल्या....

Political News : भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्यावर 3 मे 2006 रोजी गोळीबार झाला होता. तर त्यांचा 6 मे 2006 रोजी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
Poonam Mahajan
Poonam Mahajansarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी ऐन निवडणुकीच्या काळात भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे षडयंत्र होते का? या प्रश्नाचे उत्तर देताना माजी खासदार पूनम महाजन यांनी त्यादिवशीचा पूर्ण घटनाक्रमच सांगितला आहे. तसेच या प्रकरणावर आपण हे आत्ता पहिल्यांदाच बोलत नसून तीन वर्षांपूर्वीच बोलले होते.पण त्यावेळी मीडियाने ते दाखवले नाही.

पूनम महाजन यांनी यावेळी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येच्या षडयंत्राची चौकशी करण्याची मागणी गृहमंत्र्यांना पत्र लिहून करणार असल्याचीही माहिती दिली.या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली तर प्रत्येक पक्षाचे त्याला समर्थनच असेल, असेही सांगत पूनम महाजन म्हणाल्या. (Poonam Mahajan News)

दोन टर्म खासदार राहिल्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पूनम महाजन (Poonam Mahajan) यांचा पत्ता कट करण्यात आला होता. त्याच पूनम महाजन यांनी शुक्रवारी (ता.8) साम वृत्तवहिनीला मुलाखत दिली.यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांच्यावर 3 मे 2006 रोजी गोळीबार झाला होता. तर त्यांचा 6 मे 2006 रोजी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता.

या अचानक झालेल्या प्रकारामुळे महाजन कुटूंब संपूर्ण हादरले होते. लग्न झाल्यानंतर मी त्यांच्या घराजवळच राहत होते. मी घटनेच्या दिवशी सकाळीच फोन केला होता. त्यावेळी बाबांनी मला दहा मिनिटानंतर घरी ये, असेही सांगितले होते. मात्र, दहा मिनिटानंतर घरातूनच फोन आला आणि बाबांवर गोळीबार झाल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी मी लहान मुलाला घरीच सोडले अन धावतच गेले. पण तोपर्यंत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, अशा शब्दांत प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी त्या घटनेच्या दिवशीचा घटनाक्रम परत एकदा सांगितला.

Poonam Mahajan
Amit Deshmukh: 'मुझको राणाजी माफ करना' असे भरसभेत अमित देशमुख का म्हणाले ?

प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे षडयंत्र होते का ? या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या, 'त्यांच्यावर गोळीबार करण्याचे कारण हे फारच क्षुल्लक सांगितले जाते. मात्र, ते सांगितले जात असलेले कारण त्या मागे नव्हते तर अजून ही कुठेतरी वाटते की बाबांची हत्या वेगळ्या कारणासाठी झाली असावा, असा संशय असल्याचे पूनम महाजन यांनी स्पष्ट केले.

ही घटना घडल्यानंतर एक दीड वर्षाने आम्ही राहत असलेल्या घराच्या परिसरात मोठं मोठे बॅनर लावण्यात आली होती. त्यामध्ये या हत्येचे कारण वेगळे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मला याचा कुठेतरी संशय येतो. त्यामुळे पुन्हा एकदा आता वडिलांच्या या हत्येप्रकरणात आपण केंद्रीय गृहखात्याला पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून या घटनेमागील सत्य बाहेर आणण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Poonam Mahajan
Poonam Mahajan: निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पूनम महाजनांनी वाढवलं भाजपचं टेन्शन; केला 'हा' गंभीर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com