मुनगंटीवारांचा राऊतांना टोमणा; अजितदादांचा निर्णय फिरवल्याची करून दिली आठवण

वीज कनेक्शन तोडणीस स्थगितीचा निर्णय अधिवेशनानंतरही कायम राहावा : सुधीर मुनगंटीवार
Sudhir Mungantiwar-Ajit Pawar-Nitin Raut
Sudhir Mungantiwar-Ajit Pawar-Nitin RautSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शेतकऱ्यांचा वाढता असंतोष आणि सत्ताधारी-विरोधकांचा दबाव यामुळे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना थकीत वीजबिल वसुलीसाठी सुरू करण्यात आलेली वीज कनेक्शन तोडणीची मोहिम अखेर थांबवावी लागली. तशी घोषणा राऊत यांनी विधानसभेत केली आणि अभिनंदनाच्या ठरावात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राऊतांना टोला लगावला. वीज कनेक्शनबाबतचा निर्णय अधिवेशन संपल्यानंतरही कायम राहावा, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) वीजबिल वसुली व कनेक्शन तोडणीस दिलेली स्थगिती अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खुद्द ऊर्जामंत्र्यांनी उठवली होती. त्याची आठवण करून देत मुनगंटीवार यांनी राऊतांना चिमटा काढला. (Decision regarding power connection should be maintained even after convention: Sudhir Mungantiwar)

राज्यातील वीजबिलाची थकीत रक्कम ६४ हजार कोटींवर पोचली आहे. त्यामुळे ऊर्जा विभागाकडून वीजबिल वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडणीची मोहिम हाती घेतली होती. त्यास ऊर्जामंत्री राऊत यांनी आज विधानसभेत बोलताना तीन महिन्यांपर्यंत स्थगिती दिली. तसेच, तोडण्यात आलेली वीज कनेक्शन जोडण्याचा आदेशही दिला. त्याबद्दल राऊतांचे अभिनंदन करताना मुनगंटीवार बोलत होते.

Sudhir Mungantiwar-Ajit Pawar-Nitin Raut
सत्ताधारी अन् विरोधकांपुढे नितीन राऊत झुकले; शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा

ते म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांचा आणि सभागृहातील सदस्यांचा आक्रोश ऐकून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कनेक्शन न तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने ऊर्जामंत्र्यांचे स्वागत आणि अभिनंदन करतो. अभिनंदन करताना अपेक्षा व्यक्त करतो की, ऊर्जामंत्री म्हणून आपण घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. तो निर्णय विधीमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतरही कायम राहावा, एवढीच इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो, असे म्हणत मुनगंटीवार यांनी राऊतांना टोला लगावला.

Sudhir Mungantiwar-Ajit Pawar-Nitin Raut
दरेकरांनी आडनाव बदलून दरोडेखोर करावं! नाना पटोलेंचा खोचक सल्ला

यापूर्वीच्या अधिवेशनात खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन तोडणीला स्थगिती दिली होती. मात्र, अधिवेशन काळापुरताच तो निर्णय राहिला होता. कारण अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ऊर्जामंंत्री राऊत यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती उठवत वीजबिल वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडणीची मोहिम पुन्हा सुरु करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. तोच धागा पकडून माजी मंत्री मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्र्यांना चिमटा काढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com