उत्पल पर्रीकरांना पणजीकरांनी नाकारले; फडणवीसांची खेळी यशस्वी!

पणजीतून उत्पल पर्रीकर यांचा ६७५ मतांनी पराभव
Utpal Parrikar-Devendra Fadnavis |Utpal Parrika News |Devendra Fadnavis News | Political news updates in marathi
Utpal Parrikar-Devendra Fadnavis |Utpal Parrika News |Devendra Fadnavis News | Political news updates in marathi Sarkarnama
Published on
Updated on

पणजी : गोव्याच्या राजकारणात बडे प्रस्थ मानले गेलेल्या पर्रीकर यांना विधानसभा निवडणुकीत धक्का बसला आहे. पणजीतून अपक्ष निवडणूक लढविणारे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकरांना (Utpal Parrikar) पणजीकरांनी नाकारले असून त्यांचा पराभव झाला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पणजीतून उत्पल यांच्याऐवजी बाबूश मोन्सेरात यांना भाजपचे तिकिट दिले होते. या ठिकाणी मोन्सेरात यांनी बाजी मारत फडणवीसांची खेळी यशस्वी करून दाखवली आहे. (Defeat of Utpal Parrikar from Panaji)

पणजी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढलेले उत्पल पर्रीकर यांचा ६७५ मतांनी पराभव झाला आहे. त्यांना 5857 मते मिळाली आहेत. भाजपकडून लढलेले बाबूश मोन्सेरात यांना 6531 मते मिळाली आहेत, तर काँग्रेसचे उमेदवार ईल्विस गोम्स हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांना ३०६२ मते मिळाली आहेत. या ठिकाणी शिवसेनेने आपला उमेदवार मागे घेत उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा दिला होता. (Political news updates)

Utpal Parrikar-Devendra Fadnavis |Utpal Parrika News |Devendra Fadnavis News | Political news updates in marathi
प्रमोद सावंत चौथ्या फेरीअखेर ६०५ मतांनी आघाडीवर; राणेंचा विजय; कामत उंबरठ्यावर

गोवा भाजप म्हणजे मनोहर पर्रिकर हे समीकरण होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपदाची धुरा प्रमोद सावंत यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पर्रिकर यांच्याशिवाय होणारी ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष गोव्याच्या निवडणुकीकडे लागले होते. पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल यांनी पणजीतून भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, गोव्याचे प्रभारी असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल यांना दुसऱ्या मतदारसंघाचा पर्याय देत पणजीतून उमेदवारी नाकारली होती. मनोहर पर्रीकर यांचे निधन आणि भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे उत्पल यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली होती. मात्र, सहानुभूतीचे रुपांतर मतात होऊ शकले नसल्याचे दिसून येत आहे.

Utpal Parrikar-Devendra Fadnavis |Utpal Parrika News |Devendra Fadnavis News | Political news updates in marathi
भाजपच्या धमाकेदार विजयाची ठाकरे सरकारला धास्ती : दहा मार्चनंतर राज्यातही घडामोडी

या सर्व घडामोडीत देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. त्यांनी आपली सर्व ताकद भाजपत आलेल्या मोन्सेरात यांच्या पाठीशी लावत त्यांना जिंकून आणले आहे, त्यामुळे उत्पल पर्रीकर यांना पराभावाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, फडणवीस यांनी बिहारपाठोपाठ गोव्यात भाजपला सत्तेत आणल्यामुळे त्यांचे पक्षातील वजन वाढले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com