प्रमोद सावंत चौथ्या फेरीअखेर ६०५ मतांनी आघाडीवर; राणेंचा विजय; कामत उंबरठ्यावर

गोवा विधानसभा निवडणूक निकालात भारतीय जनता पक्ष १९ जागांवर, तर काँग्रेस १० जागांवर, महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष चार जागांवर आघाडीवर आहे. अपक्ष ३ जागी आघाडीवर आहेत.
Pramod sawant News
Pramod sawant News sarkarnama

पणजी : गोवा विधानसभा निवडणूक निकालात चढ-उतार दिसून येत असून पहिल्या टप्प्यात पिछाडीवर असलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत चौथ्या फेरीअखेर आघाडीवर आले आहेत. सुरुवातीला ४३६ मतांनी पिछाडीवर असलेले सावंत यांनी चौथ्या फेरीनंतर तब्बल ६०५ मतांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, विश्वजित राणे आणि दिव्या राणे यांनी निवडणूक जिंकली आहे. (Pramod Sawant leads with 605 votes in the fourth round)

गोवा विधानसभा निवडणूक निकालात भारतीय जनता पक्ष १९ जागांवर, तर काँग्रेस १० जागांवर, महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष चार जागांवर आघाडीवर आहे. अपक्ष ३ जागी आघाडीवर आहेत. साखळी मतदारसंघामधून मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पहिल्या टप्पात पिछाडीवर पडले होते. या ठिकाणी धर्मेश सगलांनी यांनी आघाडी घेतली होती. मात्र, चौथ्या फेरीअखेर प्रमोद सावंतांनी सगलांनी यांना पिछाडीवर ढकलत आघाडी घेतली आहे. ते सध्या ६०५ मतांनी आघाडीवर आहेत.

Pramod sawant News
दिग्गजांना धक्का : सहा आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर!

भाजप 19 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे

भाजप 19 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे, काँग्रेस 10 मतदार संघातून आघाडीवर आहेत, मगो 4 मतदारसंघातून, अपक्ष उमेदवार 3 मतदारसंघातून आघाडीवर आहेत. मडगावमधून दिगंबर कामत हे 5849 मतांनी पुढे आहेत.

Pramod sawant News
Punjab Election Results : आपच्या झाडूने काँग्रेसचा सुपडा साफ; सिद्धू, कॅप्टन अमरिंदर सिंग पराभवाच्या छायेत

भाजप नेते विश्वजित राणे यांची प्रतिक्रिया

गोव्याच्या निवडणुकीत भाजपचा मोठा विजय होईल, असा विश्वास भाजप नेते विश्वजित राणे यांनी गुरुवारी व्यक्त केला. 'गोव्याची ही निवडणूक आम्ही जिंकू. लोकांनी घोटाळेबाजांना, बाहेरच्या लोकांना नाकारले आहे. त्यांनी गोव्यातील लोकांसाठी काम करणाऱ्या पक्षाला मतदान केले आहे,' असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com