मन्या सुर्वेचं एन्काउंटर करणारे इसाक बागवान फडणवीसांच्या निशाण्यावर

इसाक बागवान यांनी नोकरी असताना ४२ एकर जमीन खरेदी केली. त्या जमिनी दाऊदच्या संपर्कात असलेल्या फरीद मोहम्मद अली याच्या नावाने खरेदी केल्या.
Devendra Fadnavis-Isaac Bagwan
Devendra Fadnavis-Isaac BagwanSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : कुख्यात गुन्हेगार मन्या सुर्वेचं एन्काउंटर करणारे इसाक बागवान यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (ता. २४ मार्च) आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ते करताना फडणवीस यांनी बागवान यांच्या भावाने केलेल्या तक्रारीचा आधार घेतला आहे. इसाक बागवान यांनी नोकरी असताना ४२ एकर जमीन खरेदी केली. त्या जमिनी दाऊदच्या संपर्कात असलेल्या फरीद मोहम्मद अली याच्या नावाने खरेदी केल्या. त्याचा पुढे मृत्यू झाला. पण या प्रकरणात मुंबईतील एका नेत्याने हस्तक्षेप केला, तो नेता कोण आहे, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. (Devendra Fadnavis's allegations against retired police officer Isaac Bagwan)

राज्यातील कायदा-सुव्यवस्था या विषयावर विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी इसाक बागवान यांच्यावर अत्यंत घाणाघाती आरोप केले आहेत. फडणवीस म्हणाले की, माझ्याकडे एक तक्रार आली आहे. त्याबाबतचा एक पेन ड्राईव्ह आहे, तो मी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देणार आहे. इसाक बागवन नावाचे एक अधिकारी मुंबई पोलिस दलात होते. त्यांंच्याबाबत त्यांच्याच भावाने एक तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, इसाक बागवान हे पोलिस दलाच्या सेवेत असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावली आहे. बारामती ते मुंबईपर्यंतच्या संपत्तीची ती यादी आहे. त्यात ४२ एकर जमिनीचा समावेश आहे.

Devendra Fadnavis-Isaac Bagwan
आमदार राजेंद्र राऊतांच्या मुलांचा जीव धोक्यात : फडणवीसांचा गंभीर आरोप

इसाक बागवान यांनी नोकरीत असतानाच ४२ एकर जमिनीची खरेदी केली आहे. त्यांनी ती इतरांच्या नावाने खरेदी केली आहे. त्यात फरीद मोहम्मद अली याच्या नावाने जमिनी खरेदी केल्याची नोंद आहे. तो फरीद अल्ली दाऊदच्या संपर्कात होता. पुढे त्याचा मृत्यू झाला. मात्र, नुसता अर्ज देऊन बागवान यांनी ह्या मालमत्ता आणि जमिनी आपल्या नावावर करून घेतल्या आहेत. ती करताना इसाक बागवान यांनी कपूर नावाच्या व्यक्तीला ही मालमत्ता विकली. त्यानंतर अवघ्या दोनच महिन्यात त्याच्याकडून परत घेतली आहे. या सर्व प्रकरणात मुंबईतील एका नेत्याने हस्तक्षेप केला आहे. तो मुंबईतील नेता कोण, असा सवालही फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना उपस्थित केला.

Devendra Fadnavis-Isaac Bagwan
जानकरसाहेब, दुसरे एक मित्र जवळ आल्याने सध्या तुमच्याकडे दुर्लक्ष : अजितदादांनी घेतली फिरकी

अजित पवारांचा नंबर वापरून मागितली खंडणी

महाविकास आघाडी सरकारच्या गुन्हेगारांची मजल किती वाढली आहे, ते बघा. थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा नंबर वापरून 20 लाखांची खंडणी मागितली गेली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला आहे. या प्रकरणाचा ‘व्हॉट्स-ॲप’ वरील संवाद आहे. 376 दाखल झाल्यावर अटक न करणे हा कुठला नियम आहे? खरे तर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com